घरमुंबईअकरावी प्रवेशासाठी अखेरची संधी

अकरावी प्रवेशासाठी अखेरची संधी

Subscribe

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दहाहून अधिक फेर्‍या पूर्ण झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असून या प्रवेशाना आता प्रवेशासाठी नवी संधी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय प्रवेश समिती कडून चौथी आणि अखेरची फेरीचे वेळापत्रक शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार ८ ऑक्टोबरपासून ही फेरी सुरु होणार असून ३० ऑक्टोबरपर्यंत ही फेरी सुरु राहणार आहे. तरी प्रवेशापासून वंचित राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची फेरी असून यानंतर ही प्रक्रिया बंद झाल्याचे जाहीर करण्यात येईल असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सर्वसाधारण फेर्‍यानंतर विशेष प्राध्यान्य फेर्‍या पार पडल्या आहेत. आतापर्यंत दहाहून अधिक फेर्‍या झाल्या असून त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरींचे आयोजन करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालक विभागाने केली होती. त्यानुसार या फेरीत आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, कॉलेजांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, एटीकेटी असलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, नव्याने नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. या फेरीत विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द करूनही प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकतात. मात्र या फेरीसाठी कॉलेजांमधील रिक्त जागांची स्थिती ही अगदी अल्प असेल यामुळे या सर्वाचा विचार करून मग विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया करावी, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केली आहे.

प्रवेश फेरीचे वेळापत्रक

  • ८ ऑक्टोबर – सकाळी ११ वाजता – रिक्त जगणंच तपशील जाहीर होणार
  • ८ ते ९ ऑक्टोबर – सकाळी ११ ते ५
    • १) यापूर्वीचे प्रवेश रद्द करणे
    • २) महाविद्यालयांनी शिल्लक अल्पसंख्यांक , इनहाऊस , व्यवस्थापन जागा समर्पित करणे
  • ९ ऑक्टोबर- रात्री ८ वाजता – रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे
  • १० ते १९ ऑक्टोबर – सकाळी ११ ते ५ पर्यंत – नवीन अर्ज सादर करणे, , अपूर्ण अर्ज अप्रूव्ह करणे,
  • १० ते १९ ऑक्टोबर – सकाळी ११ ते ५ पर्यंत – प्राधान्य फेरी ४ मध्ये सहभागी होऊन, ऑनलाईन क्लिक करन महाविद्यालयांत जाऊन प्रवेश अपडेट करणे
  • १७ ते २० ऑक्टोबर – सामान्य शाखेतील इच्छुक विद्यार्थी बायफोकलमध्ये ट्रान्स्फर करून घेणे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -