घरमुंबईते देवदूतासारखे धावून आले...!

ते देवदूतासारखे धावून आले…!

Subscribe

निसर्गग्रस्तांना उघड्या घरांना छप्पर मिळाले

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याचे खूप मोठे नुकसान झाले असून बर्‍याच घरांचे पत्रे उडून, कौले पडून, चिरे आणि मातीच्या भिंती कोसळून घरांची मोठी पडझड झाली आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू झाला असून घरांवर घालायला पत्रे मिळत नव्हते आणि जे मिळत होते त्याचे भाव दुप्पट-तिप्पट होते. यामुळे श्रीवर्धनकर त्रस्त झाले होते. यातून तातडीने मार्ग काढणे गरजेचे असताना श्रीवर्धनकर असलेल्या उत्तम फुटाणकर आणि प्रसाद महाडकर यांच्या जोरदार प्रयत्नांमुळे शेवटी ग्रामस्थांची पत्र्यांची व्यवस्था झाली.

श्रीवर्धन परिसरातील समस्यांची व्यथा प्रसाद महाडकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कानावर टाकली. स्वतः. देसाई यांनी पुढाकार घेऊन स्वस्तिक पत्रे बनवणार्‍या कंपनीच्या मालकाशी बोलून रविवार १४ जून रोजी 25 टन (एक ट्रक) पत्रे श्रीवर्धनला पाठवले. या पत्र्यांची संपूर्ण रक्कम उत्तम फुटाणकर यांनी स्वतः अगोदर भरली. विशेष म्हणजे दोन तासांत पत्र्यांची विक्री कंपनीच्या भावात करून ग्रामस्थांची मोठी अडचण दूर केली.

- Advertisement -

विशेष म्हणजे उत्तम फुटाणकर यांनी आपण स्वतः लोकांना मदत केलीच, पण आपल्या परिचयातील लोकांना मदतीचे आवाहन केले. यामुळे ठाण्याचे विनोद पाटील, जगन्नाथ मोरे, आप्पा देसाई (जय जननी प्रतिष्ठान, गोराई), सुहास पडते, व्हीपीएम स्पोर्टस् क्लब दहिसर, सुनील फुटाणकर, विजय रणखांबे, सुनिल चव्हाण, ओंकार भोसले, डॉ. तुलशीदास पाटील ( कराड), शिवाजी पाटिल (इस्लामपूर), दिनकर मोहिते, माणिक बाबर, दिलीप शेठ (उरण) यांनी आपल्या परीने आर्थिक व वस्तूंच्या स्वरूपात मोठी मदत केली. यामुळे गावातील गरजू गरीब ग्रामस्थांना प्लास्टिक कापड, मेणबत्ती, बॅटरी आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -