घरमुंबईसोयरीक जमवण्यासाठी मुंबईत आलेल्या पित्यावर चोरट्यांचा हल्ला

सोयरीक जमवण्यासाठी मुंबईत आलेल्या पित्यावर चोरट्यांचा हल्ला

Subscribe

मुलीची सोयरीक जमवण्यासाठी मुंबईत आलेल्या पिता मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी सर.जे.जे रुग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुलीची सोयरीक जमवण्यासाठी मुंबईत आलेल्या पिता मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी सर.जे.जे रुग्णालयता उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. हार्बर मार्गावरील रे रोड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दि.२९ रोजी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोबाईल चोरट्यामुळे रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी दोन मोबाईल चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या चोरट्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

नेमके घडले काय?

अख्तरअली मेहबूबअली खान(५५) असे मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवाश्याचे नाव आहे. अख्तरअली मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर जिल्हा येथे राहणारा आहे. अख्तरअली हा दोन महिन्यापूर्वी मुलीची सोयरीक जमवण्यासाठी मुंबईत आला होता. मुंबईत नातेवाईक नसल्यामुळे तो मानखुर्द चिंता कॅम्प येथे एका मित्राच्या घरी राहत होता. अख्तरअली हा शुक्रवारी दि.२९ रोजी दुपारची नमाज अदा करून दुसऱ्या एका मित्राला भेटण्यासाठी सॅन्डहर्स्ट रोड येथे निघाला होता. त्याने मानखुर्द येथून ट्रेन पकडून सॅण्डहर्स्ट रोड येथे जाताना, रे रोड रेल्वे स्थानक आल्यामुळे तो ट्रेनच्या दाराजवळ येऊन उभा होता. दरम्यान, २० ते २२ वयोगटातील दोन तरुण ट्रेनमध्ये चढले, ट्रेन सुरु होताच या दोघांपैकी एकाने अख्तरअलीच्या शर्टाच्या खिशात हात घालून मोबाईल फोन चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अख्तरअलीने त्यांना विरोध करताच या दोघांनी त्याला मारहाण करून धावत्या ट्रेन उतरत असताना अख्तरअली याचा मोबाईलसह शर्ट ओढला असता अख्तरअली धावत्या ट्रेनमधून फलाटावर पडून जखमी झाला. चोरटयांनी मात्र हा प्रकार बघून तेथून धूम ठोकली. फलाटावरील प्रवाश्यांनी ताबडतोब रेल्वे प्रशासनाला कळवले असता वडाळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवासी अख्तरअलीला उपचारासाठी सर.जे.जे.रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -