घरमुंबईराष्ट्रवादी नाही तर, आता भाजपचे 'डावखरे'!

राष्ट्रवादी नाही तर, आता भाजपचे ‘डावखरे’!

Subscribe

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार निरंजन डावखरे हे गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पक्ष कार्यालयात निरंजन डावखरे भाजपात प्रवेश करतील. डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले होते. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादीला रामराम करत असल्याचे निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले निरंजन डावखरे?

- Advertisement -

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझी कोंडी झाली होती. पक्षश्रेष्ठींच्या कानावर मी सर्व गोष्टी घातल्या पण, न्याय मिळाला नाही. म्हणून मी भाजपात प्रवेश करत आहे. शिवाय मी भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे.” असे, देखील डावखरे यांनी स्पष्ट केले.

निरंजन डावखरेंचा भाजप प्रवेश निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

- Advertisement -

२०१९च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून २०१२ साली निवडून आले होते. विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे ते पुत्र. डावखरे यांनी आमदारकीचा राजीनामा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे तर, राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला.

राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

दरम्यान, निरंजन डावखरेंची राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले आहे. स्व. वसंत डावखरे शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. वसंत डावखरे राष्ट्रवादीसाठी नेहमी आदरस्थानी आहे. त्याप्रमाणे निरंजन डावखरे यांना देखील राष्ट्रवादीने सन्मान दिला. पदवीधर आमदार केले. तरीही, त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला? हे अनाकलनीय आहे. असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?

निरंजन डावखरे यांच्या पाठोपाठ आमदार नरेंद्र पाटील देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मंगळवारी नरेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे देखील कळतेय. त्यामुळे नरेंद्र पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या साऱ्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेससाठी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर धोक्याची घंटा आहे हे मात्र नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -