दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर काल पावसाने उसंत घेतली होती. मात्र या धो-धो पडणाऱ्या पावसाने तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला होता. मात्र, मध्य रेल्वेवरील कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली असल्याने या मार्गावर पडलेल्या पावसामुळे लोकलसेवेची वाहतूकीचा चांगलाच बोजवारा उडाला होता.
दिवसांनी ही सेवा पूर्ववत
दरम्यान, शनिवार आणि रविवार या दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर पाणी साठले होते. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे मंगळवारी मध्य रेल्वेवरील कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा पूर्वपदावर येईल आणि त्याचप्रमाणे दोन दिवसांनी ही सेवा पूर्ववत झाली आहे.
CR Updates:
Traffic between Badlapur-Karjat resumes.
CSMT -KJT Sch 04:48
KJT-CSMT Sch 05:53
Thane- KJT sch 05:00— Central Railway (@Central_Railway) August 6, 2019
वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मरेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न
या मार्गावरील असणाऱ्या अनेक ठिकाणी रुळांवरची माती, खडी वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मरेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र आता ही सेवा पूर्ववत झाली आहे. मध्य रेल्वेने ट्विट करत ही माहिती दिली आहे. कर्जत बदलापूर मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे.