घरताज्या घडामोडीआंबिवलीत आगीच्या दोन घटना : सुदैवाने दुर्घटना टळली

आंबिवलीत आगीच्या दोन घटना : सुदैवाने दुर्घटना टळली

Subscribe

आंबिवली परिसरात बाळकृष्ण पेपर मिलमधील रद्दीच्या गठ्ठ्यांना आणि टेम्पोतील चाऱ्याला आग लागल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

कल्याणनजीक आंबिवली परिसरात बाळकृष्ण पेपर मिलमधील रद्दीच्या गठ्ठ्यांना आणि टेम्पोतील चाऱ्याला आग लागल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने वेळीच कामगार कंपनीबाहेर पळाले त्यामुळे कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चाऱ्याची आग विझल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

कल्याणजवळील आंबिवलीमध्ये असणाऱ्या बाळकृष्ण पेपर मिलमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. मिलमधील रद्दीच्या गठ्ठ्यांना ही आग लागल्याने काही क्षणातच रुद्ररूप धारण केल्याने कंपनीतील कामगारांनी बाहेर पळ काढला. यामुळे सुदैवाने आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. या पेपर मिलमध्ये रद्दीचा बॉयलरमध्ये लगदा करून त्यापासून नवीन पेपर बनविण्यात येतात. या रद्दीच्या गठ्ठ्यांना अचानक आग लागली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण आणि उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत होते. ही आग कंपनीत इतर ठिकाणी पसरू, नये म्हणून जेसीबीच्या साह्याने रद्दीचे गठ्ठे बाजूला करण्यात आले. आगीचे नेमके कारण काही समजू शकलेले नाही. तर दुसरीकडे अटाळी गावात साई सदन इमारतीखाली उभ्या असणाऱ्या पिकअप टेम्पोतील चाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी इतर नागरिकांच्या मदतीने पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्यास सुरुवात केली. तर या आगीची झळ इमारत किंवा इतर कोणाला बसू नये, यासाठी हा टेम्पो मोकळ्या मैदानात नेण्यात आला अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विनोद शिंदे यांनी दिली. दरम्यान, याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने या टेम्पोतील चारा काढून तो पसरवण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.


हेही वाचा – होळीसाठी झाडे तोडाल तर तुरुंगाची हवा खाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -