घरमुंबईस्वच्छता सर्वेक्षणात उल्हासनगर महापालिकेचा क्रमांक घसरला

स्वच्छता सर्वेक्षणात उल्हासनगर महापालिकेचा क्रमांक घसरला

Subscribe

स्वच्छता सर्वेक्षणात उल्हासनगर महानगरपालिकेच्या आसपासच्या नगरपालिका, महानगरपालिका प्रगती करत असताना उल्हासनगर मनपाची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात उल्हासनगर महानगरपालिकेच्या आसपासच्या नगरपालिका, महानगरपालिका प्रगती करत असताना उल्हासनगर मनपाची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या वेळेस १०७ क्रमांकावर असलेले उल्हासनगर यंदा १२३ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. अवघ्या १३ वर्ग किलोमीटर क्षेत्रात उल्हासनगर महानगरपालिका विस्तारलेली आहे. शहरात अजूनही शौचालयांची दुरवस्था आहे. असंख्य शौचालये मोडकळीस आलेली आहेत. एवढच नव्हे तर महापौर पंचम कलानी यांच्या पॅनलमधील दरवाजा नसलेले, मोडकळीस आलेले आणि भयंकर अस्वच्छ असलेल्या शौचालयाचे फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.

सव्वा चार लाखाच कंत्राट

अनेक शौचालये तोडून त्या जागा भूमाफियांनी हडप केलेल्या आहेत. शौचालये उपलब्ध नसल्याने अद्यापही काही ठिकाणी लोक उघड्यावर शौचाला बसतात. त्यामुळे हगणदारीमुक्त शहर बनवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. उघड्यावर होणारी हगणदारी थांबवण्यासाठी तत्कालीन आयुक्त निंबाळकर यांनी गुड मॉर्निंग पथक स्थापन केले होते. हे पथक उघड्यावर शौच करणाऱ्यांना गुलाबाचे पुष्प देऊन गांधीगिरी करत असे, नंतर दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. डंपिंग ग्राउंडचे व्यवस्थापन अद्यापही मनपाला जमलेले नाही. शहरातील कचरा उचलण्याचा कंत्राट कोणार्क या कंपनीला प्रतिदिन सव्वा चार लाख रुपये असा दिला जातो. एवढा महाग कंत्राट देऊनही स्वच्छता राखण्यास या कंपनीला अपयश आले आहे.

- Advertisement -

१०७ वरून १२३ वा क्रमांक

स्वच्छता सर्वेक्षणात काही धार्मिक धर्मगुरूंच्या हाती “स्वच्छता दूत “ची कमान सोपवण्यात आली आहे. या धर्मगुरूंच्या शिष्यांची संख्या मोठी आहे. धर्मगुरू आणि मनपा प्रशासन यांच्या सांगण्यावरून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अॅप डाउनलोड करण्यात आले. यात उल्हासनगर महापालिकेचा ५० वा क्रमांक आला होता. मात्र प्रत्यक्षात यंदा स्वच्छता सर्वेक्षणात पालिकेचा १०७ वरून सर्वेक्षणातील क्रमांक १२३ वर फेकला गेला. याबाबत पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

हेही वाचा – 

अखेर घोषणा झाली! ७ टप्प्यांमध्ये मतदान, निकाल २३ मे रोजी

- Advertisement -

वाचा! राज्यात कधी, कुठे होणार मतदान

निवडणूक काळात सोशल मीडियावर असतील ‘हे’ निर्बंध!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -