सीताराम कुंटे झाले मुख्यमंत्र्यांचे शेजारी

कुंटे यांचे दालन आता बदलले असून त्यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी दालन देण्यात आले आहे.

Upper Chief Secretary Sitaram Kunte's chamber has changed

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा या मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या दालनावर लागून राहिल्या होत्या. विशेष म्हणजे, सहाव्या मजल्यावरील बहुचर्चित दालन कोणाच्या नावावर जाते, हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरले होते. मात्र हे दालन अद्याप कोणाला देण्यात आलेले नाही. तरी आता सध्या नवीन दालन चर्चेचा विषय ठरला आहे. ते म्हणजे, अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या दालनाची. कुंटे यांचे दालन आता बदलले असून त्यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी दालन देण्यात आले आहे.

६०२ क्रमांकांचे दालन कोणाच्या पदरी?

बहुचर्चित ठाकरे सरकारचा शपथविधी पूर्ण झाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाल्यानंतर मंत्र्यांना कोणते दालन आणि बंगले मिळतात. याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. आपल्या सोयीनुसार दालन मिळावे, यासाठी अनेक मंत्र्यांनी लॉबिंग देखील सुरु केले होते. पण सहाव्या मजल्यावरील बहुचर्चित ६०२ क्रमांकांचे दालन कोणाच्या पदरी पडते. हे पाहणे उत्सुकतेचे ठरले होते.

सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे शेजारी

त्यानंतर झालेल्या दालनाच्या वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील उत्तरेकडील दालन जाहीर करण्यात आले होते. हे दालन पूर्वी अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन होते. त्यामुळे कुंटे यांना नेमके कोणते दालन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अनेकांनी कुंटे यांना ६०२ क्रमांकाचे दालन देण्यात येईल, अशी शक्यता देखील वर्तविली जात होती. मात्र आता कुंटेंच्या दालनाचा प्रश्न मार्गी काढण्यात आला आहे. कुंटे यांना सहाव्या मजल्यावरच दालन देण्यात आले आहे. कुंटे यांना ६०२ क्रमांक न देता त्याच्याच शेजारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूला दालन देण्यात आले आहे. त्यामुळे सीताराम कुंटे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शेजारी झाले आहेत.

Sitaram Kunte's chamber
सीताराम कुंटे यांचे दालन

अजित पवारांच्या दालनाचे नुतनीकरण

सीताराम कुंटे यांनी नुकताच या दालनातून आपल्या पदाचा कार्यभार सुरु केला आहे. तर जुन्या दालनात सध्या अजित पवार यांचे दालन होणार असून सध्या या दालनाच्या नुतनीकरणाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे याठिकाणी आता नवीन दालन तयार होणार असून हे नवीन दालन नेमकं कसे असेल? याबाबत अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडेंच्या दालनात अजित पवार

सध्या अजित पवार हे धनजंय मुंडे यांना देण्यात आलेले पहिल्या मजल्यावरील दालनातून काम करीत असून मुंडे हे सहाव्या मजल्यावरील दालनातून काम पाहत असल्याने अजित पवारांकडे येणाऱ्या अनेकांना सहाव्या वरुन पहिल्या मजल्यावर फेरफटका मारावा लागत असल्याचे चित्र मंत्रालयात दिसून येत आहे.

हेही वाचा – वाडिया वाचणार, पण अटींवर; अनियमिततेची चौकशी होणार!