घरमुंबईचेहरा पाहून मेट्रो स्थानकात प्रवेश

चेहरा पाहून मेट्रो स्थानकात प्रवेश

Subscribe

लवकरच ग्रीन चेकपोस्ट

मेट्रो स्थानकांवर लागणार्‍या रांगा कमी करण्यासाठी मेट्रो स्थानकांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. ग्रीन झोनच्या माध्यमातून नुसत्या चेहर्‍याच्या ओळखीवर मेट्रो स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सध्याच्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर सुरक्षा यंत्रणेसाठी हा प्रायोगिक प्रकल्प महिनाभरात सुरू होणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिली. स्टेशन अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड मोबिलिटी प्रोग्रामच्या निमित्ताने एमएमआरडीएत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मेट्रोच्या स्थानकांवर सध्याची दिसणारी गर्दी या ग्रीन झोनच्या संकल्पनेमुळे कमी होईल. ग्रीन झोनमध्ये हिरवी लाईट लागताना मिळणारा प्रवेश म्हणजे तुमचा चेहरा यंत्रणेने ओळखला आहे यावर शिक्कामोर्तब होईल. सध्याच्या यंत्रणेमध्ये एका व्यक्तीसाठी सरासरी ६ ते ७ सेकंद इतका वेळ लागतो. पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे एका मिनिटात १० जण मेट्रो स्थानकांवर प्रवेश मिळवू शकतील. प्रत्येक प्रवाशासाठी लागणारा वेळ या यंत्रणेमुळे कमी होईल. शिवाय सुरक्षेसाठी ताटकळत उभे राहून ट्रेन चुकण्याचे प्रकारही कमी करता येतील. अवघ्या १८ ते २० मिलिसेंकद इतक्या कमी वेळात प्रवाशाच्या चेहर्‍याची ओळख पटवून ही माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रीन झोनच्या अ‍ॅक्सेससाठी उपलब्ध होईल.

- Advertisement -

या यंत्रणेचा फायदा हा मेट्रो स्थानकांवर दैंनदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी अधिक होईल. मेट्रो कार्डच्या माध्यमातून सहज प्रवास करणे या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे. पण प्रवाशांना ग्रीन झोनच्या अ‍ॅक्सेससाठी मेट्रोच्या वेबसाईटवर आपला फोटो अपडेट करावा लागेल. एमएमआरडीएने ऑर्बो या कंपनीसोबत या तंत्रज्ञानासाठी करार केला आहे. त्यानुसार प्रायोगिक प्रकल्पाला कमी गर्दीच्या दोन स्थानकांवर सुरूवात होईल.

असा मिळेल ग्रीन झोनमधून प्रवेश

मेट्रो स्थानकावर ग्रीन झोनच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्यासाठी मेट्रो प्रवाशांना मेट्रोच्या वेबसाईटवर तीन फोटो अपलोड करावे लागतील. त्यामध्ये समोरच्या दिशेने पाहणारा तसेच चेहर्‍याच्या दोन्ही बाजूंचा समावेश असलेले फोटो अपलोड करावे लागतील. हे फोटो अपलोड झाल्यानंतर त्या प्रवाशाला मेट्रो स्थानकावरील कॅमेर्‍याच्या माध्यमातून अ‍ॅॅक्सेस मिळवता येईल. एकदा प्रवासी स्टेशनवर आल्यानंतर त्यापुढच्या सर्व स्थानकांवर संबंधित प्रवाशाचा डेटाबेस अपडेट होईल. त्यामुळे प्रवासाठीचे स्थानक संपुष्टात आल्यानंतर त्याच्या मेट्रोच्या वॉलेमधून प्रवास केलेले फोटो आपोआप वजा होण्यासाठीही या डेटाबेसची मदत होईल.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -