घरमुंबईराज यांचा रंगतो सुपाऱ्यांचा फड, विनायक राऊत यांचा आरोप

राज यांचा रंगतो सुपाऱ्यांचा फड, विनायक राऊत यांचा आरोप

Subscribe

निवडणुका आल्या की, राज ठाकरे हे सुपाऱ्या घेऊन काम करतात. मनसेने फक्त स्वप्न बघावित, असा टोला राऊत यांनी लगावला

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. भाजपचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंना टोला लगावला होता. या पाठोपाठ आता खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निवडणुका आल्या की, राज ठाकरे हे सुपाऱ्या घेऊन काम करतात. मनसेने फक्त स्वप्न बघावीत, असा टोला राऊत यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, निवडणूक आली की, अस्तित्व टिकविण्यासाठी राज ठाकरे हे असे मेळावे घेतात. निवडणुका आल्या की कोणाची ना कोणाची सुपारी वाजवण्याचे काम राज ठाकरे गेली अनेक वर्षे करत आहेत. राऊत पुढे म्हणाले, राज ठाकरे हे केवळ नक्कल करून राजकारण करतात. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल ते करतात. उद्धव ठाकरे यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या पोटात दुखत आहे.

- Advertisement -

कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, कोरोना काळात तेव्हाचे मुख्यमंत्री तब्यतेचे कारण देऊन घराबाहेर पडले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी कांडी फिरवली आणि त्यांना जाग आली. आता ते घराबाहेर पडले आहेत. राज्यभर फिरत आहेत. त्यांच्यासारखा मी नाही. जनतेसाठी मी अनेक आंदोलने केलीत, असे राज ठाकरे म्हणाले होते. रझा अकादमीने आंदोलन केले, तेव्हा तुम्ही कुठे होतात, असा सवाल राज यांनी केला होता. त्याचे प्रत्युत्तर देताना विनायक राऊत यांनी राज यांच्यावर टीका केली. रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी राज यांच्या भाषणाला उत्तर दिले. संजय राऊत यांनी राज यांच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -