घरमुंबईअश्लील व्हिडीओद्वारे महिलेचा विनयभंग; तरुणाला अटक

अश्लील व्हिडीओद्वारे महिलेचा विनयभंग; तरुणाला अटक

Subscribe

अश्लील व्हिडीओद्वारे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. फरहान ऊर्फ फैजान इस्तेयाक शेख असे या 19 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी डी.बी. मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांनी सांगितले.

तक्रारदार महिला ही 37 वर्षांची असून ती गिरगाव परिसरातील एका डॉक्टरकडे रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने अश्लील व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता समोरील तरुणाने तिलाच जाब विचारुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. या घटनेनंतर तिने डी.बी. मार्ग पोलिसांत अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करीत होते. तांत्रिक माहितीवरुन पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या पथकातील संतोष साळुंखे, अतिष लोहकरे, प्रकाश पाष्टे, नंदकुमार बेळणेकर, आरिफ पटेल, प्रमोद शिर्के, राजेश सोनावणे यांनी ग्रँट रोड येथून फरहान शेख या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- Advertisement -

चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये त्याने स्वत:चे अश्लील व्हिडीओ काढून ते व्हिडीओ तक्रारदार महिलेला पाठविले होते. फरहान हा नागपाडा येथील कामाठीपुरा, दारुवाला इमारतीच्या इमारत क्रमांक अकरामध्ये राहत असून कामाठीपुरा येथील केएमसी मेडीकल शॉपमध्ये तो डिलीव्हरी बॉयचे काम करतो. तक्रारदार या एका डॉक्टरकडे कामाला असल्याने त्यांचा एक व्हॉटअप ग्रुप आहे. याच ग्रुपमध्ये फरहान हादेखील आहे. त्याने ग्रुपमधून तिचा मोबाईल घेऊन तिला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -