घरमुंबईमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मुंबईत विभागप्रमुखांच्या निवडी जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मुंबईत विभागप्रमुखांच्या निवडी जाहीर

Subscribe

मुंबई – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. याता मुंबईसाठी 5 विभागप्रमुख तर 3 विभाग संघटकांना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील पदाधिकारी, नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एका विशेष बैठकीत हा निर्णय जाहीर केला.

या विभागात करण्यात आल्या नियुक्त्या –

- Advertisement -

दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक 10 मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली. भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक 6 मधून आमदार मंगेश कुडाळकर यांचि विभागप्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक 12 मधून दिलीप नाईक यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक 9 मधून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

- Advertisement -

याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्य नेतृत्वात या नव्या नियुक्त्या जाहीर झाल्याने शिंदे गाटाच्या विस्तारासाठी नवीन बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -