घरमुंबईवॉण्टेड सिनेअभिनेत्री आरती सक्सेनाला अटक

वॉण्टेड सिनेअभिनेत्री आरती सक्सेनाला अटक

Subscribe

बोगस कॉलसेंटरद्वारे विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या सिनेअभिनेत्री आरती सक्सेना हिला अटक करण्यात आली आहे.

बोगस कॉल सेंटरद्वारे विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका सिनेअभिनेत्री आणि मॉडेलला सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. आरती सक्सेना असे या अभिनेत्रीचे नाव असून अटकेनंतर तिला येथील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरती ही या गुन्ह्यात अटक झालेली सातवी आरोपी असून यापूर्वी सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात तौफिक रफिक शेख, डेव्हीड जॉर्ज अल्फान्सो, संदीप धनुषधारी यादव, बिपीन रामतिर्थ गुप्ता ऊर्फ साहू, डेल सॅबी जसिन्टो आणि शादाब मेहमूद शेख यांचा समावेश आहे.

संगणक दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून होत होती फसवणूक

बोगस कॉलसेंटरद्वारे काही विदेशी नागरिकांची फसवणुक करणारी एक टोळी असून ही टोळी अंधेरी परिसरात कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१८ रोजी या पथकाने अंधेरीतील एस. व्ही रोडवरील सबवेसमोरील वेस्ट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या मेसर्च एक्सफीनिटी कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान ३९ संगणकावर विदेशी नागरिकांचा अनधिकृपणे डाटा प्राप्त करुन त्याद्वारे व्हिओआयपी कॉल आणि ई-मेलद्वारे स्वतविषयी खोटी माहिती देऊन व्हायरल आणि मालवेअर क्लिन करण्याचे तसेच संगणक सॉफ्टवेअरद्वारे संगणक दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून फसवणुक करीत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

आरोपी करायचे विदेशी नागरिकांची फसवणुक

एक्सफीनिटी ही वेबसाईट मनोरंजन करणारी नोंदणीकृत वेबसाईट आहे. मात्र त्याच्या नावावर तिथे काम करणारे आरोपी विदेशी नागरिकांची फसवणुक करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत नंतर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. त्यांच्या तपासात आरतीने या कॉल सेंटरमध्ये गुंतवणुक केली होती. तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच तिच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तिने अटकेच्या भीतीने विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तिला २५ मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, मात्र नंतर तिला मुदतवाढ देण्यास कोर्टाने नकार देताच सोमवारी तिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तिला येथील लोकल कोर्टाने २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरती ही कंपनीचा पार्टनर तौफिक याच्या संपर्कात होती, असे तपासात उघडकीस आले आहे.


वाचा – भिवंडीत पेपरफुटी प्रकरणी चौथा शिक्षक अटकेत

- Advertisement -

वाचा – व्यसनापायी आईचे दागिने चोरणारा अटकेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -