घरमुंबईकल्याणमध्ये फरार गुन्हेगाराला पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक

कल्याणमध्ये फरार गुन्हेगाराला पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक

Subscribe

कोळसेवाडी पोलीस स्थानकात रवी विरुद्ध ६ गुन्हे दाखल असून यापैकी तीन प्रकरणात तो फरार होता. अखेर आज पोलिसांनी त्याल अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलीस यंत्रणा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. रेकॉर्डवरील एका फरार गुन्हेगाराला पेालिसांनी कल्याणमध्ये अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढी असे त्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

सापळा रचून कारवाई

कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात रवी दाढी हा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती गुप्त माहितीगारांमार्फत कोळसेवाडी पोलीसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पेालिसांनी सदर ठिकाणी सापळा लावला होता. याचवेळी रवी दाढी त्या परिसरात येताच पेालिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे आढळून आली.

- Advertisement -

आरोपीवर ६ गंभीर गुन्हे

कोळसेवाडी पोलिसांनी रवी दाढीला अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस स्थानकात रवी विरुद्ध ६ गुन्हे दाखल असून यापैकी तीन प्रकरणात तो फरार होता. रवी या परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोवार यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास नलावडे, पोहवा शिर्के, दहिफळे, श्रीवास, पो.ना. जमादार भोजणे, जाधव या पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा – 

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीत गावठी दारू विक्री तेजीत; ३७ ठिकाणी पोलिसांची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -