Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणार झटपट पिझ्झा....

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणार झटपट पिझ्झा….

Related Story

- Advertisement -

आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार मिळावा म्हणून एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर फूड वेंडिंग मशिन बसवण्यात येणार आहे. प्रवाशांना या वेंडिंग मशिन मधून पिझ्झा, फ्राईज, पॉपकॉर्न आणि इतर फास्टफूड झटपट मिळू शकणार आहे.

आयआरसीटीसीने या योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकाची निवड केली आहे. अशी योजना सुरु होणारं मुंबई सेंट्रल हे भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक असणार आहे. जून महिन्याच्या शेवटी ग्राहकांसाठी वेंडिंग मशिन वापरण्यास उपलब्ध होणार आहे.

७ मिनिटांत मिळणार पिझ्झा

- Advertisement -

या मशिनमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचे पिझ्झा ८-१० इंचाच्या आकारात उपलब्ध असणार आहेत. बेकिंगपासून तर पिझ्झावरील टॉपिंगपर्यंतची सर्व प्रक्रिया या मशिनमध्येच होणार असून ग्राहकांना अवघ्या ७ मिनिटांत गरमागरम पिझ्झा खाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मशिनमधून मिळणाऱ्या पिझ्झाची किंमत पिझ्झाच्या आकारानुसार असणार आहे. उदा. पिझ्झाचा एक स्लाईस, संपूर्ण गोल पिझ्झा, थिन पिझ्झा, थिक पिझ्झा. ग्राहकांना पिझ्झा ७० रुपयांपासून तर २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे.

pizza
पिझ्झा

वेंडिंग मशिनवरुन खरेदी करताना…

- Advertisement -

ग्राहकांना वेंडिंग मशिनमधून खाद्य पदार्थ विकत घेताना कॅश सोबतच डेबिट आणि क्रेडिट कार्डाचासुद्धा वापर करता येणार आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांसाठी वेंडिंग मशिनद्वारे खाद्यपदार्थ खरेदी करणे सोयीचे होणार आहे.

 

 

 

यापूर्वीचा वेंडिंग मशिनचा प्रयोग

यापूर्वी आयआरसीटीसीने बंगळुरु रेल्वे स्थानकावर वेंडिंग मशिनद्वारे ग्राहकांना ज्यूस देण्याची सोय केली आणि ती योजना आता यशस्वीपणे सुरु आहे.

आयआरसीटीसीचे फूड अॅप

आयआरसीटीसी मार्फत २०१६ला बनवलेल्या एका फूड अॅपद्वारे देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर विविध प्रकारचे रेस्टॉरंटस् जनआहार आणि इतर खासगी केटरर्स कार्यरत आहेत. या अॅपच्या माध्यामातून लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील प्रवासी ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करु शकतात. या अॅपला सुरुवातीला खूपच कमी प्रतिसाद मिळायचा. आता मात्र या अॅपद्वारे खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे. या अॅपवर आता दररोज जवळपास ३५०० ऑर्डर दिल्या जात आहेत.

- Advertisement -