घरमुंबईwestern highway : एटीएम, स्तनपान केंद्र, मोबाईल चार्जिंग; दहिसरला होणार सर्व सोयीसुविधांचे प्रसाधनगृह

western highway : एटीएम, स्तनपान केंद्र, मोबाईल चार्जिंग; दहिसरला होणार सर्व सोयीसुविधांचे प्रसाधनगृह

Subscribe

 

मुंबई-:पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत अडकलेल्या व दूर अंतरावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, मालक यांना पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग, खर्चासाठी पैसे काढण्याकरिता एटीएम मशीन आणि महिलांना आपल्या लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी विशेष सुविधा असलेले सार्वजनिक शौचालय दहिसर (पूर्व) येथे उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

तसेच, या शौचालयांमध्ये स्त्री, पुरुष, तृतीय पंथीयांसह दिव्‍यांगांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे, सौर ऊर्जा निर्मिती व्यवस्था असणार आहे. त्यामुळे शौचालयात वापरण्यात येणाऱ्या विद्युत खर्चात मोठी बचत होणार आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत अडकलेल्या व प्रसाधन गुहासाठी ताटकळणाऱ्या वाहन चालक व नागरिकांना विविध सुविधा असलेल्या या शौचालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पूर्व उपनगरात द्रुतगती मार्गावर अशी आधुनिक शौचालये उभारण्यात आली आहेत.

मुंबई महापालिका दहिसर (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर जकात नाक्याजवळ अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची लवकरच उभारणी करणार आहे. त्यामध्ये सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’चीदेखील सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे शौचालयाच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्र स्थापन होणार असून त्यापासून वीज निर्मिती देखील होणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ.भाग्‍यश्री कापसे आणि उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या सुचनेनुसार दहिसर (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १२ हजार ९१६ चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आर/उत्‍तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर यांनी दिली आ‌हे.

हेही वाचाः“भाजपचे ट्विट महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवणारे”

या अद्ययावत शौचालयाची उभारणी ही दहिसर (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणार आहे. या ठिकाणी चहा कॉफीसह पेय पानाची देखील व्यवस्था असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयासह सभोवतालच्या जागेवर रंगीत फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. पुरूषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप यामध्ये समाविष्ट असेल. तसेच, पावसाचे पाणी पुनर्भरण / संचयन करण्याची देखील तजवीज केली जाणार आहे.

गोरगावलाही होणार सुविधाजनक शौचालय

गोरेगाव ( पूर्व ) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ विविध अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एटीएम मशीन व सौर ऊर्जा निर्मितीद्वारे विजेच्या बचतीची सुविधा असणार आहे. स्त्री, पुरुष व तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्जिंग स्टेशन व पेय पदार्थांसह आदी सुविधा मिळणार आहे. गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर १ हजार ४५३ फूट एवढ्या प्रशस्त जागेमध्ये सिसिटीव्ही कॅमेऱ्यासह सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पी/दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांनी दिली आ‌हे. या प्रस्तावित शौचालयामध्ये पुरूषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -