सगळ्या महत्त्वाच्या केसेस वाझेंकडेच का सोपवल्या जातात? – संदीप देशपांडे

शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सचिव वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?', असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Why all important cases are handed over to Wazen Sandeep Deshpande slams to sachin waze
सगळ्या महत्त्वाच्या केसेस वाझेंकडेच का सोपवल्या जातात? - संदीप देशपांडे

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी महत्त्वाचा दुवा असलेला मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशल सचिव वाझे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. राजकिय वर्तुळातही या प्रकरणी अनेक चर्चा सुरु आहेत. सचिव वाझेंवर अनेक टिका केल्या जात आहेत. मनसेनेही या प्रकरणी सचिव वाझे यांच्यावर टिका केली आहे. ‘शिवसेनेत आल्यानंतरच सचिन वाझेंवर सगळ्या महत्त्वाच्या केसेस का सोपवल्या जातात? शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सचिव वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?’, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबत ट्विट करत संदीप देशपांडे यांनी सचिव वाझेंवर टिका केली आहे.

‘सचिव वाझे यांनी २००८लासी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या वाझेंकडेच कशा सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिव वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?’, असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाची चौकशी NIA कडे द्या अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यांची मागणी फेटाळत गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपावला. महाराष्ट्र, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत असे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांना असे काय झाले की त्यांनी या प्रकरणाचा तपास थेट ATS कडे सोपवला. सचिव वाझे यांची वागणूक ही संशायस्पद आहे, असा आरोप फडणवीसांनी केला. गृहमंत्री नेमकं कोणाला वाचवायचा प्रयत्न करतायत असा सवालही फडणवीसांनी गृहमंत्र्यांना केला.


हेही वाचा – सचिन वाझेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तपास एनआयएकडे सोपवा