घरमुंबईकॅटरिंगच्या कामाच्या आमिषाने महिलेवर लैगिंक अत्याचार

कॅटरिंगच्या कामाच्या आमिषाने महिलेवर लैगिंक अत्याचार

Subscribe

दोन महिलांसह सहाजणांना अटक

कॅटरिंगच्या कामाच्या आमिषाने एका 40 वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. एक महिना वेगवेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवल्यानंतर तिचे इतर पुरुषांसोबत जबदस्तीने विवाह लावून या टोळीने तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यास भाग पाडले तसेच घरी पुन्हा पाठविण्यासाठी तिला ब्लॅकमेल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहाजणांना कुरार पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले.

विवेक ऊर्फ विक्की रामानंद जांगीड, मुकेशकुमार बद्रीप्रसाद जांगीड, क्रिष्णा सुमेर कुमार, परवीनकुमार लालचंद जांगीड, कविता प्रताप जाधव ऊर्फ सलमा अकबर भट्टी आणि कुसुम ऊर्फ रेखा राजू शिंदे ऊर्फ रेखा दौलत निकम अशी या सहाजणांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत सहाही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत महिला मालाड येथे तिच्या पतीसह चार मुलांसोबत राहते. काही दिवसांपूर्वी तिची कुसूम हिच्याशी ओळख झाली होती.

- Advertisement -

या ओळखीत तिने गुजरात आणि राजस्थान येथे कॅटरिंगचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला होता. तिला चांगले पैसे मिळतील असेही सांगितले. याच दरम्यान तिने तिची राजू या व्यक्तीशी ओळख करुन दिली. त्यानंतर त्या दोघीही 5 नोव्हेंबरला गुजरात येथून निघून गेल्या. अहमदाबाद येथे विजय नावाच्य एका व्यक्तीसोबत तिला पाठवून नंतर तिला चार दिवस एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी तिला कुसूम, विजय आणि राजू यांनी कविता या महिलेच्या घरी आणले. तिथेच ती दोन दिवस राहिली. त्यानंतर या चौघांनी तिला राजस्थान येथे घेऊन गेले.

यावेळी कृष्णकुमार याने तिला प्रदीप नावाच्या एका व्यक्तीच्या घरी आणून तिथे तिला चार ते पाच व्यक्तींना दाखविण्यात आले होते. हा प्रकार तिला संशयास्पद वाटताच तिने त्यांना जाब विचारुन तिला घरी पाठविण्याची विनंती केली. मात्र या सर्वांनी तिला धमकी देऊन ते सांगतील तेच तिला करावे लागेल, नाहीतर तिला वेश्याव्यवसायासाठी तिथे डांबून ठेवण्यात येईल असे सांगितले. 18 नोव्हेंबरला तिचे मुकेशकुमार याच्याशी एका मंदिरात जबदस्तीने लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर मुकेशकुमारने तिला एका वकिलाकडे आणून तिचे काही शासकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -