राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढल्या, ‘त्या’ महिलेने दिली आत्महत्येची धमकी

शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप करणाऱ्या  महिलेने आता आत्महत्येची धमकी दिली आहे.

Like Mumbai's Gift City, develop Mumbai's BKC; Demand of Rahul Shewale

शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप करणाऱ्या  महिलेने आता आत्महत्येची धमकी दिली आहे. यामुळे राहुल शेवाळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संबंधित महिलेने याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. त्यात पोलीस आपली तक्रार नोंदवून घेत नसल्याने आपण त्यांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश देत मला न्याय द्यावा अशी मागणी या महिलेने केली आहे. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही महिलेने दिला आहे.

एप्रिल महिन्यात एका महिलेने शेवाळे यांनी लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर बलात्कार केला असा आरोप केला होता. याप्रकरणी तिने शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. मात्र शेवाळे यांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले होते. आपली सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने ही तक्रार करण्यात आल्याचा आरोप शेवाळे यांनी तक्रारीत केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शेवाळे यांनी आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात येत असल्याची तक्रार साकीनाका पोलिसांकडे केली. त्यानंतर शेवाळेंनी महिलेविरोधात फसवणूक, खंडणी आणि बदनामी केल्याची तक्रार केली.

संबधित महिलेने व्यवसायासाठी आर्थिक मदतीकरिता आपल्याला संपर्क केला. तसेच काही व्हिडीओ व्हायरल करत पत्नीशी घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करण्याचा दबाव आणल्याचे शेवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच बदनामी करत माझ्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तिने ५६ लाख रुपये, आयफोनसह बारा वस्तू भेटवस्तू म्हणून घेतल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे.