घरदेश-विदेशदिल्ली आग दुर्घटना; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह राजकीय नेत्यांनी व्यक्त केले दुःख

दिल्ली आग दुर्घटना; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह राजकीय नेत्यांनी व्यक्त केले दुःख

Subscribe

दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

दिल्लीच्या राणी झांशी रोडवरील अनाज मंडी येथे आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत होरपळून ३५ जणांचा मृत्यू झाला. या आगीत ५६ जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे. या आगीबद्दल माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान येथील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान या दुर्घटनेत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

दिल्लीतील दुर्घटनेवर शोक व्यक्त करत जखमींनी लवकर बरे व्हावे अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ही दुर्घटना अत्यंत भीतीदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच संबंधीत अधिकारी घटनास्थळावर असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचवत आहेत. असेसुद्धा पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

राष्ट्रपतींचे ट्विट

पंतप्रधानांप्रमाणेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. दिल्लीतील आगीची बातमी ऐकून वाईट वाटल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी प्रार्थनादेखील त्यांनी केली. विशेष म्हणजे, लोकांच्या संरक्षणार्थ स्थानिक अधिकारी चांगले काम करत असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

अमित शहा यांचे ट्विट

दिल्लीतील आगीच्या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल अमित शहा यांनी शोक व्यक्त केला. या घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर शक्य तेवढी सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्याचेसुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अग्निशमन दलाचे कौतुक – केजरीवाल

दिल्लीतील दुर्घटनेवर शोक व्यक्त करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले आहे. मदतकार्य चालू असून फायरमन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मी घटनास्थळी असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे ट्विट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट करत दिल्ली दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. या बातमीने मला खूप दुःख झाले असून मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – दिल्ली : अनाज मंडी येथे भीषण आग; ४३ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -