घरमुंबईवैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळणार योगाचे प्रशिक्षण

वैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळणार योगाचे प्रशिक्षण

Subscribe

मुंबईतील शासकीय दंत महविद्यालय आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी एक नवा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याद्वारे विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मुंबईतील शासकीय दंत महविद्यालय आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी एक नवा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे वैद्यकीय दंत महाविद्यालयातील बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कामाचा, अभ्यासाचा वाढता ताण आणि वरिष्ठांच्या त्रासामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वाढते प्रमाण आहे. या विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ मिळावे, यासाठी मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल यांनीही बीडीएस विद्यार्थी आणि डॉक्टरांना तणावमुक्त ठेवण्यासाठी योगाचा पर्याय निवडला आहे. येत्या ३१ ऑगस्टपासून या योगा प्रशिक्षणाला सुरूवात केली जाईल.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना सरकारी दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. विवेक पाखमोडे यांनी सांगितले की, ‘रुग्णांची सेवा करायची असल्यास डॉक्टरांनी शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ असणे गरजेचे आहे. पण, अभ्यासाचा वाढता ताण, अपुरी झोप, कामाचा ताण आणि वाढती स्पर्धा यामुळे अनेक डॉक्टर आणि विद्यार्थी खचून जातात. या ताणातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.’

डॉ. पाखमोडे पुढे म्हणाले ‘योगा शरीर स्वास्थ्य आणि मानसिक तणावापासून दूर ठेवण्यास मदत करतो. यासाठी विद्यार्थ्यांनी खास करून हा शारीरिक आणि मानसिकरित्या फिट रहावं यासाठी योगा प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना योगा शिकायचा आहे, अशा विद्यार्थांना सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स दिला जाईल.’

- Advertisement -

तसेच, सरकारी दंत महाविद्यालयातील एका डॉक्टराने दिलेल्या माहितीनुसार, ‘दर महिन्याला एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ योगा प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात योगा शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट तयार करून त्यांना सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स विनामुल्य दिला जाईल. साधारणतः एक वर्ष हा योगा प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. विद्यार्थी आणि डॉक्टरांवर वाढता मानसिक ताण कमी व्हावा, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -