घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपुणे-नाशिक महामार्गावर कार उलटली

पुणे-नाशिक महामार्गावर कार उलटली

Subscribe

बोटा शिवारातील घटना; सुदैवाने प्राणहानी टळली

संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात कार उलटली. ही घटना मंगळवारी (दि.१) सकाळी घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. दैव बल्वतर म्हणून चालक हा बालंबाल बचावला. पोलिसांच्या माहितीनुसार, कार आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात होती.

कार बोटा शिवारात असलेल्या तळपेवाडी येथे आली असता त्यावेळी कार महामार्ग सोडून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उलटली. यावेळी कारचे मोठे नुकसान झाले. कार पलटी झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूककोंडी फोडत
सुरळीत केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -