घरपालघरशहराच्या कानाकोपर्‍यात प्लास्टिकचा राक्षस फिरतोय

शहराच्या कानाकोपर्‍यात प्लास्टिकचा राक्षस फिरतोय

Subscribe

शासनाने प्लास्टिक बंदी करूनही सहजपणे बाजारात प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होत असतात त्यावर कसून कारवाई होताना दिसत नाही आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात मोठे नाले जवळपास १२० च्या आसपास आहेत. मात्र त्यात मानवनिर्मित प्लास्टिक व डेब्रिज कचर्‍याचा बोळा जाऊन बसल्याने नाले तुंबण्याची भीती नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. पालिकेकडून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई होत असते. मात्र ती पुरेशी व व्यवस्थित होत नाही. त्यातच वर्षभरात एकदाच नालेसफाई होत असल्याने स्थानिक लोकांकडून नाल्यात व गटारात प्लास्टिक व डेब्रिजचा बोळा कोंबतात. त्यातून नाले तुंबई होते. त्यातून संसर्ग वाढून मच्छर व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. शासनाने प्लास्टिक बंदी करूनही सहजपणे बाजारात प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होत असतात त्यावर कसून कारवाई होताना दिसत नाही आहे.

दररोजच्या वापरातील प्लास्टिकच्या पिशव्या कचर्‍यातून फेकल्या जात असून अनेक भागांत दाट लोकवस्ती असलेल्या शिवसेना गल्ली, जयअंबे नगर, राई शिवनेरी सह इतर भागात तर चक्क घराच्या खिडकीतून बाजूने वाहणार्‍या नाल्यात या पिशव्या फेकल्या जातात. मात्र त्या नाल्यात तशाच पडून असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कचर्‍याची दुर्गंधी पसरण्याबरोबरच प्लास्टिकचा एकावर एक थर जमा होत नाल्याचे रूपांतर कचराकुंडीत होत असते. भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीतून वाहणार्‍या नाल्यात अशाच प्रकारे प्लास्टिकचा खच पडला असून पालिकेला हा नाला साफ करण्यासाठी मुहूर्तच मिळालेला नाही.

- Advertisement -

 

शहरात प्लास्टिक व डेब्रिज कचर्‍याने राक्षसाचे रुप धारण केले आहे. त्यात मुख्यत्वे प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पर्यावरणाला धोका निर्माण करणार्‍या या प्लास्टिक वस्तूंवर बंदी असतानाही त्याचा वापर होऊ नये यासाठी कडक कारवाई करून प्लास्टिक मुक्त मीरा – भाईंदर शहर करावे.

- Advertisement -

– कृष्णा गुप्ता, अध्यक्ष , सत्यकाम फाउंडेशन.

मीरा- भाईंदर शहर हे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आम्ही पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून सात्यत्याने कारवाई करणार आहोत. ज्य ाभागात लोक नाल्यात कचरा टाकतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
– रवी पवार, उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -