घरपालघरजैन धर्मियांसाठी स्वतंत्र शौचालय बांधणे काम पालिकेकडून रद्द

जैन धर्मियांसाठी स्वतंत्र शौचालय बांधणे काम पालिकेकडून रद्द

Subscribe

पालिकेकडून धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचे सांगत, सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठू लागली होती.

भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत भाईंदर पश्चिमेला उड्डाणपुलाखाली जैन धर्मियांसाठी स्वतंत्र्य शौचालय बांधण्याचे टेंडर काढण्यात आले होते. त्याला विरोध होताच महापालिकेने टेंडर रद्द करीत नवीन टेंडर सामाजिक दायित्व निधी माध्यमातून उभारणारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी महापालिकेकडून जागा देणार की शहरातील अन्य कोणी विकासकांची जागा घेणार हे ठरवून नवीन ठिकाणी शौचालय बनवण्यात येणार आहे.मिराभाईंदर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार विविध कामांतून अनेकदा समोर आला आहे. आता चक्क जैन समाजासाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याकरता निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे पालिकेकडून धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचे सांगत, सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठू लागली होती.

भाईंदर पूर्व पश्चिमेला येजा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपूर्वी पूल उभारण्यात आला आहे. ह्या पुलाखाली एका विशिष्ट समाजासाठी शौचालय उभारण्यासाठी मिराभाईंदर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन वेगवेगळ्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी पालिकेने प्रक्रिया राबवायला सुरूवात केली होती. १२ ऑगस्ट रोजी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निवेदनुसार सुमारे आठ लाख रुपये शौचालय उभारण्यासाठी खर्च येणार होते. हे शौचालय मातीचे उभारले जाणार असल्याचे बोलले जात होते.

- Advertisement -

 

बड्या नेत्याकडून मागणी ?

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका बड्या नेत्याकडून जैन धर्मियांच्या साधुसंतांसाठी विशेष शौचालय उभारण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली होती. ह्या कामाची निविदा मनपा आयुक्त दिलीप ढोले यांच्या मंजुरीनंतरच प्रसिद्ध करण्यात आल्याचे देखील म्हटले जात आहे. ह्याला आता शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. पालिका अधिकारी जाणीवपूर्वक शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने असे प्रकार घडवून आणत असल्याचे मत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांच्या करातून एखाद्या विशिष्ट समाजासाठी शौचालय उभारता येत नाही. त्यामुळे पालिकेने आपला शहरात चाललेला सलोखा व जाती जातीत भांडणे लावल्याचे काम करू नये,अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -