घरपालघरडहाणू नगरपरिषदेचा ९० कोटी ५० लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

डहाणू नगरपरिषदेचा ९० कोटी ५० लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

Subscribe

त्याचबरोबर नगरपरिषदेचा ४२.९५ कोटी रु. खर्च आणि ३६.२३ कोटी रु. भांडवली खर्च असा एकूण ७९.१८ रुपयांचा खर्च होणार आहे.

डहाणूः कोणतीही करवाढ नसलेल्या डहाणू नगरपरिषदेचा ९० कोटी ५० लाख रुपये शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प मंजूर करताना मालमत्ता कर वसुलीबाबत नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षीच्या ८२.१९ कोटी रुपयांची आरंभी शिल्लक, ३३.१० कोटी रुपये जमा आणि ५८.९३ कोटी रुपये भांडवली जमा असे नगरपरिषदेकडे १७४ कोटी रुपये एकूण जमा होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेचा ४२.९५ कोटी रु. खर्च आणि ३६.२३ कोटी रु. भांडवली खर्च असा एकूण ७९.१८ रुपयांचा खर्च होणार आहे.

डहाणू नगरपरिषदेने अपंग लाभार्थींना दरवर्षी प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची योजना हाती घेतली असून चालू वर्षात ३१९ लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. नगरपालिका कायदा व नियमांप्रमाणे तसेच स्थायी निर्देशांनुसार अर्थसंकल्पातील प्रत्येकी पाच टक्के निधी अपंग कल्याण ( २५ लाख), महिला बालकल्याण योजना (४५ लाख) तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी (४० लाख) खर्च करण्यात येणार आहे. शहरातील क्रीडांगणे विकसित करणे, श्रीगणेश कुंडाचे सुशोभीकरण, शहरातील मुख्य स्मशानभूमी विकसित करणे, डम्पिंग ग्राउंडला कंपाउंड उभारणे आणि रस्ता अनुदानातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेमार्फत विविध प्रभागातील रस्ते विकसित करणे आदी कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगरसेवकांकडून सुचवण्यात येणार्‍या कामांसाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात येणार असून त्यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीसाठी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरात सुनियोजित मासळी बाजार बांधण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती, बगिचा सुशोभिकरण, समाज मंदिर बांधकाम, दलित वस्ती सुधारणा आदी कामांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि व्यायाम शाळेचे साहित्य खरेदी करण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -