घरपालघरडहाणू- सावटा रस्त्याच्या कामाने डहाणूकरांना दिलासा

डहाणू- सावटा रस्त्याच्या कामाने डहाणूकरांना दिलासा

Subscribe

.मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडून दुरवस्था व्हायची.

डहाणू : सतत खड्डेमय असलेल्या डहाणू ते सावटा दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे काम सुरु झाल्याने वाहन चालकांसोबतच प्रवाशांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. डहाणू- जव्हार- त्रिंबक या राज्यमार्ग 30 वरील चिंचणी बायपास ते सावटा पिंक लेक रिसॉर्टपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुरू करण्यात आले आहे.यासाठी एकूण १ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडून दुरवस्था व्हायची.

त्याचप्रमाणे मसोली,रामवाडीसारख्या सखल भागात पावसाचे पाणी साचून रस्ता उखडून जायचा.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. ज्या सखल भागात पावसामुळे खड्डे पडतात. त्या जागी सिमेंट काँक्रिट आणि इतर ठिकाणी डांबरीकरण अशा एकूण ३ किमीच्या रस्त्याचे काम सुरू केले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.या मार्गावरील चिंचणी बायपास ते सागर नाका आणि पटेल पाडा ते सावटा हातपर्यंतचा रस्ता हा उंच सखल खडबडीत आणि खड्डेमय असल्याने वाहनचालक आणि सोबतच प्रवाशांना देखील मोठा त्रास व्हायचा. पावसाळ्यात तर या रस्त्याची खूप दूरवस्था व्हायची. पावसानंतर दरवर्षी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जायची. मात्र काही दिवसांनी पुन्हा रस्ता उखडून जायचा. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार बनवण्याची अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने भरीव निधी मंजूर करून रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू केल्याने डहाणूकराना दिलासा मिळाला आहे. दरम्यान डहाणूतील या मुख्य रस्त्यावर वारंवार खड्डे पडून दुरवस्था होत असल्याने सार्वजनिक बांधकाम डहाणू उपविभागाने शासनाकडून विशेष बजेटमधून हा निधी मंजूर करून रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -