घरपालघरमुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा अग्नी तांडव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा अग्नी तांडव

Subscribe

पण कोणत्याही प्रकारची आग विजवण्याची सुविधा नसल्याने बघत राहण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत.

डहाणू, मुंबई -अहमदाबाद महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणार्‍या वाहिनीवर महालक्ष्मी ते धानिवरी दरम्यान एका टेम्पोला भीषण आग लागून टेम्पो जळून खाक झाला. बुधवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान मुंबईहून गुजरातकडे जाणार्‍या केमिकल ड्रम भरलेल्या टेम्पोस अचानक आग लागली. त्यात 40 केमिकल भरलेले ड्रम होते. केमिकल भरलेल्या ड्रमला आग लागली. ड्रम फुटून तेथील झाडाझुडपांत आग पसरली. घटनेची माहिती कासा पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस तसेच महामार्ग प्रशासनाला कळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत मदत कार्य सुरू केले. पण कोणत्याही प्रकारची आग विजवण्याची सुविधा नसल्याने बघत राहण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत.

या घटनेची माहिती तहसीलदार अभिजीत देशमुख यांना कळताच त्यांनी डहाणू अग्निशामक दलास प्रचारण केले. पण दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाली असल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळाजवळ पोहोचू शकली नाही. या आगीत दुभाजकामधील झाडेझुडपे देखील भस्मसात झाली. महामार्गावर लागलेली आग तेथील जंगलात पोहचल्याने दूरपर्यंत आग पोहोचली. या बाबतीत माहिती वनविभागाला कळताच त्यांचे कर्मचारी सुद्धा आग विझवण्याच्या प्रयत्न करीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -