Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर पालघर कासा येथे भीषण आगीत पाच दुकाने भस्मसात

कासा येथे भीषण आगीत पाच दुकाने भस्मसात

Subscribe

मात्र त्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. एकूण पाच दुकानांना आपल्या विळख्यात घेतले होते.

डहाणू: डहाणू तालुक्यातील कासा येथे मुख्य बाजारपेठेत भीषण आग लागली.त्यात एकूण पाच दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत. शुक्रवार 12 मे रोजी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कासा गावातील पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ डहाणू येथील अदानी थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. एकूण पाच दुकानांना आपल्या विळख्यात घेतले होते.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना आग लागल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे वाहने चारोटी येथे थांबवण्यात होती. पोलीस ठाण्याच्या समोर असलेले फोटो शॉप, नोवेल्टी, चप्पल दुकान, इलेक्ट्रिकल दुकान आणि एक सलून अशी पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. सुदैवाने अग्निशामक दल वेळेवर पोहोचल्यामुळे शेजारची दुकाने वाचली आहेत. अन्यथा मोठी हानी पोहोचण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शिंनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -