घरपालघरमाजी आमदार अमित घोडा शिंदे गटाच्या वाटेवर?

माजी आमदार अमित घोडा शिंदे गटाच्या वाटेवर?

Subscribe

त्यापाठोपाठ काही दिवसांआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अमित घोडा हे देखील पुन्हा भाजप सोडून शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी उलाढाल होण्याची शक्यता वाढली आहे.

डहाणू :  पालघर जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील राजकारणाला देखील वेगवेगळी वळणे मिळत असलेली पाहायला मिळत आहेत. पालघर मधील पक्षीय नेते आणि आजी माजी लोकप्रतिनिधी आपापल्या सोयीप्रमाणे पक्ष बदलताना दिसत आहेत. पक्ष बदलणार्‍या राजकारण्यांमध्ये सध्या शिंदे गट हा मुख्य पर्याय राहिला असल्याची अनेक उदाहरणे देखील पाहायला मिळाली आहेत. राज्यातील राजकारणाचे पडसाद पालघर जिल्ह्यात देखील उमटले असून, पालघरमध्ये सध्या शिंदे गटात जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. पण त्याआधी भाजपने देखील दोन माजी आमदारांना आपल्या पदरात पाडून घेत सरशी घेतली आहे. मात्र, दोन माजी आमदारांपैकी एक आमदार पुन्हा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील पालघर जिल्हाध्यक्ष व पालघर जिल्हापरिषद अध्यक्षा वैदेही वाढान यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यापाठोपाठ काही दिवसांआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अमित घोडा हे देखील पुन्हा भाजप सोडून शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी उलाढाल होण्याची शक्यता वाढली आहे.

पालघर विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा हे त्यांच्या पक्ष बदलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून तिकीट न मिळाल्यामुळे अमित घोडा यांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. मात्र, अवघ्या काही दिवसातच त्यांना पुन्हा शिवसेनेत यावे लागण्याची घटना जिल्हावसियांच्या चांगलीच आठवणीत राहिली आहे. त्यावेळी देखील शिवसेना पालघर जिल्ह्याची कमान एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, त्यांनीच अमित घोडांची समजूत काढून त्यांना स्वगृही परत आणले होते. त्यांनतर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अमित घोडा शिवसेना सोडून शिंदे गटात जाण्याची शक्यता असताना त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले आहे. त्यांनी शिंदे गटाच्या वाटेकडे पाठ करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मात्र, वैभव संखे आणि वैदेही वाढान यांच्या पक्ष प्रवेशानंतर अमित घोडा हे देखील पुन्हा भाजप सोडून शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -