घरपालघरदिव्यांगांच्या कल्याणासाठी व्यापक धोरण तयार करणार

दिव्यांगांच्या कल्याणासाठी व्यापक धोरण तयार करणार

Subscribe

महापालिका हद्दीत कृत्रिम अवयव निर्माण केंद्र सुरु करण्यात येईल तसेच महापालिकेतील दिव्यांगांसाठी व्यापक धोरण तयार करण्यात येईल असेही पवार यावेळी म्हणाले.

वसईः वसई- विरार महापालिका हद्दीतील दिव्यांगांसाठी विविध योजनांची त्वरीत अंमलबजवाणी करण्यात येईल. पदवीधर दिव्यांगांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरच सुरु केले जाईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी व्यापक धोरण तयार करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी दिव्यांगांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी शहरात लवकरच पदवीधर दिव्यांगांसाठी लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले जाईल,यासाठी स्वत: लक्ष घालून हा उपक्रम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महापालिका हद्दीत दिव्यांगांचे असलेले स्टॉल नियमाकुल करण्यासाठी महापालिकेचा परवाना ना हरकत दाखला देण्याचे आयुक्तांनी मान्य केले. महापालिका हद्दीत कृत्रिम अवयव निर्माण केंद्र सुरु करण्यात येईल तसेच महापालिकेतील दिव्यांगांसाठी व्यापक धोरण तयार करण्यात येईल असेही पवार यावेळी म्हणाले.

दिव्यांगांना महापालिकेकडून मिळणारी मासिक पेन्शनचे नुतनीकरण करण्यासाठी महापालिकेचे दिव्यांग विभागाचे कर्मचारी दिव्यांगांकडे पुन्हा सर्व कागदपत्रांची मागणी करत होते. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनात आणल्यानंतर पेन्शन
नुतनीकरणासाठी दिव्यांगांनी केवळ हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला सादर केला असेल तर तो ग्राह्य धरावा असे आदेश संबंधित यंत्रणेला आयुक्तांनी दिले. दिव्यांग बचत गटांच्या सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. महापालिकेकडून लवकरच दिव्यांगांसाठी कला क्रीडा महोत्सव आयोजित केला जाईल. अपंगत्व येऊच नये यासाठी महापालिका जनजागृत्ती कार्यक्रम आयोजित करील, असेही आयुक्त पवार यांनी सांगितले. दिव्यांगांच्या समस्यांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दिव्यांग व्यक्तींसाठी एक सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांनी सांगितले. वसई -विरार महापालिकेच्या इतिहासात दिव्यांगांच्या समस्या प्राधान्याने सोडवणारे संवेदनशील अधिकारी महापालिकेला लाभले याबद्दल खान यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -