घरपालघरदिल्लीत मुजरा पण गल्लीत गोंधळ

दिल्लीत मुजरा पण गल्लीत गोंधळ

Subscribe

साध्या पोटनिवडणुकीच्या जागेसाठी भाजपने केलेल्या राजकारणामुळे येथील शिवसेना (शिंदे ) मध्ये नाराजी पसरली असून मतभेदाबरोबरच आता मनभेदही होण्याची दाट शक्यता आहे.

मोखाडा : राज्यात नव्याने शिवसेना- भाजप युती झालेली असली तरीही स्थानिक पातळीवर मात्र मतभेद दिसून येत आहेत. याची प्रचिती काष्टी- सावर्डे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आली.तालुक्यातील काष्टी- सावर्डे या आजवर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदाच्या शर्यतीत बाजी मारत भाजपला शिवसेनेने धोबीपछाड दिला होता.याचाच वचपा काढण्यासाठी काल झालेली पोटनिवडणूक तालुका भाजपने प्रतिष्ठेची केली होती.मात्र या पोटनिवडणुकीतही सदस्य म्हणून शिवसेना (शिंदे गट )यांनी बाजी मारत सुनीता अंकुश बोटे या विजयी झालेल्या आहेत.यामुळे भाजप अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत भाजपची नाचक्की झाली असल्याची चर्चा आहे. साध्या पोटनिवडणुकीच्या जागेसाठी भाजपने केलेल्या राजकारणामुळे येथील शिवसेना (शिंदे ) मध्ये नाराजी पसरली असून मतभेदाबरोबरच आता मनभेदही होण्याची दाट शक्यता आहे.

पूर्वीपासून याठिकाणी भाजपचाच वरचष्मा राहिलेला असला तरीही या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारही भेटत नसल्यामुळे त्यांनी विद्यमान ग्राप सदस्यांनाच पुन्हा सदस्यासाठी असलेल्या पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिले होते.एवढेच काय तर तालुका भाजपमधील तालुकाध्यक्षापासून त्या भागातील उपसरपंचापासून जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांनीही या पोटनिवडणुकीत लक्ष घातले होते.अशावेळी त्याभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश बोटे,उपसभापती प्रदिप वाघ यांनी एकाकी झुंज देत या बलाढ्य लोकांचा पराभव केला होता. मुळात अगदी गावपातळीवरील असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी अंगझाडून कामाला लागले होते. चार ते पाच गाड्या घेवून तीन तीन दिवस फिरले होते.त्यामुळे सत्ते एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील संबंध चांगले नाहित हे स्पष्ट झाले आहे. अशा छोट्या छोट्या निवडणुकीतही जर भाजप या पद्धतीने लढणार असेल आम्हालाही विचार करावा लागेल असे मत येथील एका ज्येष्ठ शिवसैनिकाने व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -