घरपालघरहाफवाले जोमात फुल्लवाले कोमात

हाफवाले जोमात फुल्लवाले कोमात

Subscribe

अर्थसंकल्पात तर महिलांना अर्धे तिकीट करून टाकले. शासनाच्या या सवलतीचा फायदा घेत बसद्वारे प्रवास करणार्‍यांमध्ये ज्येष्ठांसह महिला वर्गाची संख्या चांगलीच वाढली आहे.

जव्हार : सध्याच्या शासनाने महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सेवा सुरू केली आणि बसप्रवासाकडे लाभार्थ्यांचा ओढा वाढला. परंतु,यात आता नवी ओरड सुरू झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असली तरी यात पूर्ण तिकीट घेवून प्रवास करणार्‍यांना आता बसमध्ये जागा मिळत नसल्याचे प्रवासी बोलत आहेत. फुल तिकीट प्रवाश्यांना मात्र जागा मिळण्याची मोठी पंचाईत झाली आहे. बस प्रवासात यापूर्वी ज्येष्ठांना हाफ तिकीट, शालेय मुलींना मोफत प्रवास, मुलांना प्रवासाचे पास आदी सवलती दिल्या जात होत्या. त्यात बस अवेळी येत असल्याने पूर्ण तिकिटाने प्रवास करणारे अनेक जण खासगी वाहनांचा आधार घेत होते. तर काही जण बस प्रवासालाच प्राधान्य देत होते; परंतु राज्यात सत्तांतर झाले आणि ७५ वर्षावरील नागरिकांना शासनाने बसप्रवास मोफत केला. अर्थसंकल्पात तर महिलांना अर्धे तिकीट करून टाकले. शासनाच्या या सवलतीचा फायदा घेत बसद्वारे प्रवास करणार्‍यांमध्ये ज्येष्ठांसह महिला वर्गाची संख्या चांगलीच वाढली आहे. सवलतीने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी बस फुल होत असून, पूर्ण तिकीट घेणार्‍यांना जागा मिळत नसल्याची ओरड आता सुरू झाली आहे.

शासनाने महिलांना बस प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात प्रवास करताना महिलांचा दवाखान्यासह इतर कामासाठी प्रवास करण्यात होणारा खर्च वाचला असून, अनेक गरजूंना याचा लाभ मिळत आहे.
विशाखा अहिरे,माजी नगरसेविका,जव्हार

- Advertisement -

शासनाने दिलेल्या सवलतीमुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळत आहे. बस प्रवाशांची संख्याही वाढली आहे. परंतु पूर्ण तिकीट काढणार्‍या अनेकांना जागा मिळत नाही. यामुळे जव्हार आगाराने आता विविध मार्गावरील बसफेर्‍या वाढवाव्यात. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल.

दीपक कांगणे,माजी नगरसेवक,जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -