घरपालघरवसईत पाईपलाईनने गॅस वितरणाला सुरुवात

वसईत पाईपलाईनने गॅस वितरणाला सुरुवात

Subscribe

गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला पत्रव्यवहार, मागणी-विनंती अर्ज आदी प्रयत्नांनंतर अखेर वसईच्या अंगणी पाईपलाईन गॅसगंगा अवतरली. वसईच्या एव्हरशाईन नगर या रहिवासी संकुलात जिल्ह्यातील पहिलीवहिली पाईपलाईन गॅस जोडणी मंगळवारी झाली. पाईपलाईन गॅससाठीच्या बहुजन विकास आघाडीने प्रयत्न केले होते. या पहिल्या  जोडणीचे उद्घाटन  माजी महापौर आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्या प्रविणा ठाकूर यांनी केले.

बहुजन विकास आघाडीचे पालघरमधील माजी खासदार बळीराम जाधव यांनी २०१२ मध्ये पहिल्यांदा पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाला पत्र पाठवलें होतें. या पत्राद्वारे त्यांनी वसई, विरार, पालघर आणि इतर भागांमध्ये सीएनजी आणि पाईपलाईन गॅसची जोडणी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर बहुजन विकास आघाडीने याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार आणि प्रसंगी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने देणें सुरूच ठेवलें होतें.  अखेर नऊ वर्षांच्या प्रयत्नांनंतर मंगळवारी जिल्ह्यातील पहिली पाईपलाईन गॅस जोडणी वसईत झाली. एलपीजीपेक्षा पाईपलाईन गॅस स्वस्त असल्याने या जोडणीमुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ अशा गोष्टींनी सर्वसामान्य लोक जेरीला आले आहेत. त्यात आता तुलनेने स्वस्त पाईपलाईन गॅस मिळाल्याने ही त्यांच्यासाठी सुखद झुळूक आहे. हे पाईपलाईन गॅसचें जाळें लवकरच संपूर्ण वसई तालुक्यात आणि त्यापुढे जिल्ह्यात पसरेल. बळीराम जाधव यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू तेवढे थोडे आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार क्षितीज ठाकूर यांनी दिली.

गेल्या नऊ वर्षांच्या काळात संबंधित मंत्रालय आणि नियामक मंडळ यांना हजारो पत्रें लिहिली होती. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील लोकांना आम्ही पाईपलाईन गॅसचें वचन दिलें होतें. हे वचन आम्ही पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे, असें बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisement -

पाईपलाईन गॅसचे फायदे

– सिलिंडरपेक्षा कमी दरात पुरवठा

– २४ तास विनाखंडित गॅसपुरवठा

– सुरक्षित वापर

– बचतीचा उत्तम मार्ग

– पर्यावरणावर किमान विपरित परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -