घरपालघरविरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

विरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

Subscribe

पण, सोन्याची चैन कुणीही विकत घेत नसल्याने संतापलेले दोन्ही चोरटे तरुणी आणि तिचा प्रियकर बसले होते. त्याठिकाणी परत गेले होते.

वसईः चोरट्यांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. तसेच एका आरोपीच्या डोक्यावर प्रियकराने बाटली फोडल्याने डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलेल्या दोन्ही आरोपींना विरार पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी एकोणीस वर्षीय पिडीत तरुणी प्रियकरासोबत बसली होती. त्यावेळी दोन चोरट्याने तिच्या प्रियकराच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. पण, सोन्याची चैन कुणीही विकत घेत नसल्याने संतापलेले दोन्ही चोरटे तरुणी आणि तिचा प्रियकर बसले होते. त्याठिकाणी परत गेले होते.

त्याठिकाणी दोन्ही चोरट्यांनी पिडीतेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींना विरोध करताना प्रियकराने बाजूला पडलेली काचेची बाटली एका आरोपीच्या डोक्यात फोडली होती. त्यामुळे जखमी झाल्याने दोघेही पळून गेले होते. विरार पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला होता. एक आरोपी जखमी झाल्याने जवळच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेल्याचा पोलिसांना संशय आला. व्हॉटसअप ग्रुपवर माहिती मिळताच एका डॉक्टरने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींवर ताब्यात घेतले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, बलात्कार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -