घरपालघरकुणबी समाजोन्नती संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

कुणबी समाजोन्नती संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

Subscribe

संघटना कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या कुणबी समाजाच्या मातृसंस्थेच्या कारगिल नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

विरार: कुणबी समाजाची अविरत चालू असलेली 103 वर्षाचा इतिहास असलेली संघटना कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या कुणबी समाजाच्या मातृसंस्थेच्या कारगिल नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले. नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कुणबी युवा मुंबईचे युवाध्यक्ष माधव कांबळे , गुहागर शाखेचे कृष्णा वणे , नगरसेविका चिरायू चौधरी , मिनल पाटील , संजीवनी हॉस्पिटल े प्रशासकिय अधिकारी तुकाराम पष्टे , अतुल पाटील ,बहुद्देशीय पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष विजय चोघळा , वसई शाखेचे संघटक अनंत फिलसे , मस्कर , कुंदन जैन, स्वप्नील पाटील , रमाकांत पाटील, निकीता सामंत, आरती पडवळ, काचंन लागवणकर, रेनिता सुवर्णा, विनायक शिगवण , रोहिणी हळदणकर , तनिष्का ग्रुप, जय दुर्गा महिला मंडळ, विभागीय विरार शाखेचे अध्यक्ष किशोर भेरे, युवाध्यक्ष अविनाश पाचकले , कुणबी महिला मंडळ विरारच्या अध्यक्षा नगरसेविका संगिता भेरे , शाखा सचिव विकास सुवरे, सचिव एकनाथ डिंगणकर , शाखा खजिनदार शैलेश बामणे ,शाखा उपाध्यक्ष नितीन ठोंबरे ,सल्लागार अनिल अवेरे , सुनील रेवाळे, युवा सचिव दिपक चौगुले ,दिनेश रहाटवळ,प्रचार प्रमुख शैलेश दळवी ई. मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी देखील उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी शाखेच्या या नवीन कार्यालयास व शाखेच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -