घरपालघरभाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविका वंदना पाटील यांच्या पतीची जमीन हडपली

भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविका वंदना पाटील यांच्या पतीची जमीन हडपली

Subscribe

भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविकेच्या पतीची शेतजमीन तोतया इसम उभा करून बनावट सह्या व ओळखपत्रांच्या आधारे २ कोटी १८ लाखांना विकण्यात आली आहे.

भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविकेच्या पतीची शेतजमीन तोतया इसम उभा करून बनावट सह्या व ओळखपत्रांच्या आधारे २ कोटी १८ लाखांना विकण्यात आली आहे. या बनावट व्यवहारची नोंदणी करून सातबारा नोंदी फेरफारसुद्धा करण्यात आली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविका वंदना पाटील यांचे पती विकास रामचंद्र पाटील (वय ६१) यांची मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथे २००३ साली खरेदी केलेली सुमारे ४ हेक्टर ८३ आर शेत जमीन आहे. डिसेंबर २०२१ मध्ये या जमिनीच्या सातबाराची माहिती घेतली असता, त्यांनी स्वतः ही जमीन ७ डिसेंबर २०२१ रोजी मुरबाड दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीद्वारे तुषार नीळकंठ मैद (रा. संजीवनी इमारत, स्टेशन रोड, बदलापूर) याला २ कोटी १८ लाख रुपयांना विक्री केली असल्याचे आढळून आले. त्या दस्त नोंदणी आधारे तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाने फेरफार नोंद करून पाटील यांच्या मालकीची जागा तुषार मैद याच्या नावे सातबारावर नोंद केली असल्याच्या प्रकाराने विकास पाटील व कुटुंबियांना धक्का बसला.

तुषार मैद या इसमाला ओळखत नसताना जमिनीची परस्पर विक्री व सातबारा नोंदच्या गंभीर प्रकाराबाबत पाटील यांनी तात्काळ जानेवारी महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयातून आणि तलाठी कार्यालयातून सर्व कागदपत्रे मिळवली. त्यात मालाडच्या आंबोजवाडी भागातील इसमाला विकास पाटील म्हणून उभे केले. त्या इसमाचा फोटो वापरत बनावट सह्या केल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर त्या तोतया इसमाचे पाटील यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड हे नोंदणी व्यवहारात सादर करण्यात आले होते.

- Advertisement -

याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी तुषार मैद, तोतया विकास पाटील म्हणून सांगणाऱ्या अनोळखी भामट्यासह हरीशकुमार अरोरा व बिपीन देशमुख या चौघा भामट्यांनी कट कारस्थान करून जमीन बळकावण्याचा प्रकार केल्याने गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय व तलाठी कार्यालयाने खऱ्या विकास पाटील यांची पूर्वीची खरेदी करारनामे, भाईंदरचा पत्ता , छायाचित्र उपलब्ध असताना देखील कोणतीच शहनिशा न करता दस्तनोंदणी व फेरफार करून सातबारा नोंद केली. याप्रकरणी यात गुंतलेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र मोकाट सोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा – 

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -