घरपालघरगणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करा; मीरा भाईंदरच्या महापौरांचे निर्देश

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करा; मीरा भाईंदरच्या महापौरांचे निर्देश

Subscribe

मीरा भाईंदर महापालिकेच्या अभियंत्यांच्या निरीक्षण आणि देखरेखीखाली येत्या ५ सप्टेंबरपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले.

मीरा भाईंदर महापालिकेच्या अभियंत्यांच्या निरीक्षण आणि देखरेखीखाली येत्या ५ सप्टेंबरपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले. याबैठकीला आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते. मीरा भाईंदर शहरात मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्यांची वाताहात झाली आहे. एमएमआरडीएने रस्त्याच्या कामासाठी २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र, ठेकेदार संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी महापौरांनी बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी ठेकेदाराला काम योग्यरित्या करण्यासही सांगितले.

मेट्रोमुळे छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर पूर्णपणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. वाहनचालकांनाही त्रासाचा सामना सहन करावा लागत आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी गेल्यानंतर एमएमआरडीएने यामार्गाचे असफाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बावीस कोटी रुपये खर्च येणा आहेत. ठेकेदार रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करीत असल्याच्या अऩेक तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवापूर्वी काम झाले तर नागरीकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी महापौरांनी बैठक बोलावली होती. यावेळी एमएमआरडीच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

२२ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम मे २०२१ मध्ये देण्यात आलेले आहे. सदरचे काम २२ कोटी रुपयांचे असून एमएमआरडीएने या कामी मे. जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. काम निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन केल्याने पावसाळ्यातच रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने याठिकाणी अपघात होत आहेत. याबद्दलही महापौरांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

येत्या ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिका अभियंत्यांच्या निरीक्षण व देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात यावे. दुरुस्तीचे काम करताना लाईव लोकेशन ग्रुपवर अपलोड करुन महापौर व आयुक्त यांना माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी. शहरातील रस्त्यांवर काम करतेवेळी कामाचा दर्जा समांतर असावा. तसेच रस्त्याची जाडी व दर्जा नियंत्रित ठेवण्यात यावा, जेणेकरुन येणाऱ्या नवरात्रौत्सवात रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडून नागरीकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचनाही महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा –

दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही; राणेंचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -