घरपालघरमोखाडा, जव्हार आठवडाभरात होणार 'रिचेबल'

मोखाडा, जव्हार आठवडाभरात होणार ‘रिचेबल’

Subscribe

जव्हार, मोखाडामध्ये नेटवर्कची नेहमीच आबाळ होत असल्यामुळे नेटवर्क अभावी बऱ्याचदा येथील जनता नॉट रिचेबल होत होताना दिसते.

माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवाराप्रमाणेच आता मोबाईल नेटवर्कचाही समावेश व्हावा अशीच सध्याची स्थिती आहे. मात्र असे असतानाही जव्हार, मोखाडामध्ये नेटवर्कची नेहमीच आबाळ होत असल्यामुळे नेटवर्क अभावी बऱ्याचदा येथील जनता नॉट रिचेबल होत होताना दिसते. असे असतानाही बऱ्याच वर्षांपासून तयार होवून उभारलेले जीओचे टॉवर मात्र अद्यापपर्यंत चालूच होत नव्हते. यासाठी आमदार सुनील भुसारा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना भेटून हे टॉवर तात्काळ चालू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जव्हार, मोखाडा भागातील १० टॉवर आम्ही आठवडाभरात चालू करत असल्याचे आमदार भुसारा यांना कळवले आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने नेटवर्कचा ससेमिरा सुटणार असून येथील जनता रिचेबल होईल, असे चित्र दिसत आहे.

माझ्या मतदारसंघात मोबाईल नेटवर्कची फारच दुरवस्था असल्याने याबाबत अनेकदा तक्रारीही माझ्यापर्यंत येत होत्या. यामुळे मी जिओ अधिकारी वर्गाशी बोललो होतो. याचबरोबर मी बाकी सर्व कंपन्यांशी चांगल्या नेटवर्कबाबत बोलत आहेच. माझ्या मतदारसंघातील अगदी शेवटच्या टोकातही नेटवर्क कसे राहील याबाबत पाठपुरावा सुरू आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्राम होम तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही नेटवर्कची खुप गरज पडते. त्यासाठी गावागावांत ही सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.
– सुनील भुसारा, आमदार

- Advertisement -

मोखाडा, जव्हार तालुक्यातील चारणगांव, वाशाळा, पळसुंडे, विनवळ,आसे, घानवळ, हिरवे, न्याहाळे, पोशेरा आणि बेरीस्ते या दहा ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून टॉवर उभारले होते. मात्र ते अद्याप चालुच करण्यात आले नव्हते. याशिवाय बाकी कंपन्यांच्याही नेटवर्कची कामगिरी सुमारच राहिलेली असल्याने खेडोपाडी सोडा शहरातील लोकांनाही नेटवर्कसाठी मोबाईलला रिचार्ज करूनही पुन्हा वरुन व्हायफाय सेवा घ्यावी लागली आहे. तर सरकारी कार्यालयातही नेटवर्क नसल्याने अनेक कामे रखडताना दिसतात. याशिवाय एखाद्या उंचीच्या ठिकाणीच नेटवर्क मिळत असल्याने खेडोपाड्यातील तरुण मंडळी फेसबुक व्हाटसअपसारख्या ॲपची हौस भागवण्यासाठी कधी झाडावर तर कधी एखाद्या टेकडीवर रात्री अपरात्री नेटवर्कच्या शोधात भटकताना दिसतात.

रस्ते, वीज, पाणी याचबरोबर सध्या मोबाईल नेटवर्क तितकाच महत्वाचा झाला असतानाही ती सेवा अद्यापही म्हणावी तशी मिळत नव्हती. याबाबत आमदार भुसारा यांनी पुढाकार घेवून टॉवर उभे केलेत तर चालू कधी करणार, असा सवाल करत संबधित कंपन्यांच्या अधिकारीवर्गाला धारेवर धरले होते. याची दखल घेत दहाही टॉवर आठवडाभरात आम्ही चालू करणार असल्याचे जिओच्या अधिकाऱ्यांनी आमदार भुसारा यांना लेखी कळवल्याने नेटवर्कची प्रतिक्षा आता संपून जव्हार, मोखाडावासिय रिचेबल होणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

…तर मुंबई महापालिका बरखास्त होऊन प्रशासकीय राजवट येणार; सर्व अधिकार आयुक्तांकडे जाणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -