घरपालघरकंटेनर शाखांविरोधात विरोधक आक्रमक

कंटेनर शाखांविरोधात विरोधक आक्रमक

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि त्याबाबत अधिनियमाची तरतूद असतानाही राज्यात सत्ताधारी असल्याचा फायदा घेत बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

भाईंदर :- शिवसेनेकडून मीरा -भाईंदर शहरात विविध ठिकाणी कंटेनर शाखा उभारण्यात आल्या असून त्यामुळे रहदारीला आणि नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे,अशी टीका विरोधक करत आहेत. याप्रकरणी सर्वपक्षीय विरोधकांनी पालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. आमदार सरनाईक यांनी भाईंदर पूर्व, नवघर गाव, नवघर नाका, प्रभाग क्र. ११, गोल्डन नेस्ट सर्कल, इंद्रलोक नाका आणि पूनम गार्डन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या शाखेचे व अन्य अशा जवळपास सहा कंटेनर शाखांचे उद्घाटन केले आहे. फुटपाथ हा सर्वसामान्य नागरिक चालण्यासाठी असून त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि त्याबाबत अधिनियमाची तरतूद असतानाही राज्यात सत्ताधारी असल्याचा फायदा घेत बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

तसेच पालिकेने जर बेकायदा कंटेनर शाखा हटविल्या नाहीत, तर त्याच प्रत्येक शाखेच्या बाजूने नवीन शाखा टाकण्यात येईल, असे पत्र मनसेने पालिका आयुक्तांना दिले आहे.याबाबत भाजपचे माजी नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, शिवसेना (उबाठा) चे माजी नगरसेवक प्रवीण पाटील, तारा घरत, माजी गटनेत्या नीलम ढवण, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, काँग्रेसचे दिप काकडे यांनी विरोध करत ते अतिक्रमण केलेले बेकायदा कंटेनर काढून टाकण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -