घरपालघरओस्तवाल बिल्डरांचा घोटाळा विधीमंडळात

ओस्तवाल बिल्डरांचा घोटाळा विधीमंडळात

Subscribe

बिल्डर उमराव ओस्तवाल यांनी भाईंदर पूर्वेला 'ओस्तवाल ऑरनेट' ह्या इमारतीचा बोगस नकाशा बनवुन तब्बल ४०० हुन अधिक फ्लॅट व गाळे विकल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच त्यावर विधानपरिषदेचे आमदार विलास पोतनीस यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.

मीरा भाईंदर शहरामधील बिल्डर उमराव ओस्तवाल यांनी भाईंदर पूर्वेला ‘ओस्तवाल ऑरनेट’ ह्या इमारतीचा बोगस नकाशा बनवुन तब्बल ४०० हुन अधिक फ्लॅट व गाळे विकल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच त्यावर विधानपरिषदेचे आमदार विलास पोतनीस यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा अहवाल मागवण्यात आला आहे.

‘बोगस नकाशा’ च्या आधारे फ्लॅट विक्री केल्याप्रकरणी ‘उमराव सिंग ओस्तवाल बिल्डर’वर नवघर पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ओसवाल ऑरनेट’ ह्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम व बिल्डर उमराव सिंग ओसवालविरोधात शिजॉय मॅथ्यू यांनी लेखी तक्रार पुराव्यानिशी दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पूर्वेकडील जेसलपार्क परिसरात मुख्य रहदारीच्या महापालिकेचा डीपी रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेल्या सातमजली ‘ओसवाल ऑरनेट’ च्या मूळ बांधकाम नकाशात बदल करून शासकीय अधिका-यांची बनावट सही व शिक्के मारून ४०० च्या आसपास फ्लॅट व गाळे विकल्याची मॅथ्यू यांची तक्रार आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे तक्रारीचा पोलिसांनी पाठपुरावा केल्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्यासह सहाय्यक संचालक नगररचनाकार ठाणे कार्यालय यांनी अहवाल सादर केला होता. त्यानंतर नवघर पोलिसांनी २१ मे रोजी बिल्डर उमरावसिंग ओसवाल विरूद्ध भा.द.वि. कलम ४२०,४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपासात बोगस ओसी व बोगस नकाशा बनवण्या-याचा शोध घेतला जाणार आहे. बिल्डर उमरावसिंग ओसवालला मदत करणा-या संबंधित अधिकारी व सदर इमारतीला भोगवटा दाखला मिळवण्यासाठी तब्बल चार वेळा मागणी अर्ज दाखल करणा-या सल्लागार अभियंत्याचीही कसून चौकशी केल्यास अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप ओस्तवाल बिल्डरला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. अशा गुन्ह्यात आम्ही सर्वसामान्य जनतेच्या बाबतीतही अशाच प्रकारे अगोदर चौकशी करूनच नंतर त्यांना अटक करून पुढील कारवाई करतो, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांनी सांगितले.

हेही वाचा –

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, बॉम्ब शोधक पथक दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -