घरपालघरलालपरी सुसाट! प्रवाशांनी खासगी वाहनांकडे फिरवली पाठ

लालपरी सुसाट! प्रवाशांनी खासगी वाहनांकडे फिरवली पाठ

Subscribe

जवळपास पाच महिने ग्रामीण भागातील बससेवा बंद असताना खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले होते. परंतु एसटी सेवा पूर्ववत झाल्याने खासगी वाहनांकडे प्रवाशांनी आता पाठ फिरवली आहे.

जवळपास पाच महिने ग्रामीण भागातील बससेवा बंद असताना खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले होते. परंतु एसटी सेवा पूर्ववत झाल्याने खासगी वाहनांकडे प्रवाशांनी आता पाठ फिरवली आहे. मागील काही दिवसांपासून जव्हार आगारातील एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्याने लालपरी सुसाट धावत आहे. त्यामुळे संपाच्या काळात खासगी वाहतुकदारांनी प्रवाशांची केलेली लूट आता थांबली आहे. परिणामी प्रवाशांचा ओढा आता एसटीकडे वाढला आहे. तसेच एसटीच्या फेऱ्या गावोगावी वाढल्याने प्रवाशांची गैरसोय टाळल्याचे एकीकडे दिलासादायक चित्र आहे. तर दुसरीकडे खासगी वाहन चालकांच्या उत्पन्नाला चाप बसला आहे.

 

- Advertisement -

आता सर्व कर्मचारी कामावर रुजू झाल्याने सगळ्या मार्गावर एसटी बसेस सुरु झाल्या आहेत. त्याचा फटका खासगी वाहतुकदारांना बसला आहे. तसेच खासगी प्रवासी वाहतुकदारांच्या अच्छे दिनला पुन्हा ब्रेक लागला आहे. लालपरी चालक व वाहक कामावर परतल्याने एसटी पुन्हा सुसाट सुटली आहे.
– राहुल जगताप, प्रवासी

 

- Advertisement -

प्रवाशांना पर्याय नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असे. या काळात खासगी वाहतुकदार अवाच्या सवा प्रवासी भाडे आकारत होते. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत होती. आता एसटी सुरळीत सुरू झाल्यामुळे ही लूट थांबली आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी ९ वाजताच उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हात अनेकांनी प्रवास न करणेच पसंत केले. परिणामी खासगी वाहन चालकांना प्रवाशांची वाट बघत थांबावे लागते.

 

सध्या पेट्रोल, डिझेलची होणारी दरवाढ प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या मुळावर उठत आहे. एकीकडे वेळेवर प्रवासी मिळत नाहीत. तर दुसरीकडे दिवसभर फिरुन ५०० रुपयांचे उत्पन्नही हाती लागत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
– खाजगी वाहनचालक

 

मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. वाढत्या इंधनाच्या दरामुळे वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असले तरी, दैनंदिन होणारी प्रवासी वाहतूक अपेक्षित अंदाजानुसार नाही. शिवाय खासगी वाहनधारकांना सध्या प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे गाडीचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे खासगी वाहनमालक चिंतेत आहेत.

 

हेही वाचा –

मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -