घरपालघरकारेगाव आरोग्य केंद्राची दुरवस्था; रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर, कर्मचारीच नाही

कारेगाव आरोग्य केंद्राची दुरवस्था; रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर, कर्मचारीच नाही

Subscribe

मोखाड्यातील वाकडपाडा, किनिस्ते, कोचाळे, सायदे परिसरात चिकणगुण्या आणि डेंग्यु सदृश्य आजाराचे मोठ्या संख्येने रूग्णपिडीत आहेत.

नागरीकांकडुन आलेल्या तक्रारीनंतर भुसारांनी मोखाड्यातील कारेगांव आरोग्य पथकाला अचानक प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी अथवा रूग्णांवर उपचार करणारा एकही कर्मचारी हजर नव्हता. आरोग्य पथकाच्या इमारतीला सर्वत्र गळती लागलेली दिसली. या भागात चिकणगुणिया आणि डेंग्यु सदृश्य आजाराचे मोठ्या संख्येने रूग्ण असतांना त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याचे दिसून आल्याने आमदार भुसारांनी संबंधित कामचुकार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आदिवासी ग्रामस्थांना सरकारी दवाखान्यात केवळ पांच रूपयांत उपचार मिळतात. मात्र, कामचुकार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे, आदिवासींना पदरमोड करून खाजगी दवाखान्यात इलाजासाठी जावे लागते आहे. ही बाब गंभीर असून संबंधित कामचुकार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
– सुनील भुसारा, आमदर

- Advertisement -

मोखाड्यातील वाकडपाडा, किनिस्ते, कोचाळे, सायदे परिसरात चिकणगुण्या आणि डेंग्यु सदृश्य आजाराचे मोठ्या संख्येने रूग्णपिडीत आहेत. येथील रूग्णांना सरकारी दवाखान्यात योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली होती. तसेच कारेगांव आरोग्य केंद्राची दयनिय अवस्था झाली असल्याची समस्या येथील ग्रामस्थांनी मांडली होती. त्याची तातडीने दखल घेत भुसारांनी याठिकाणाची पाहणी केली. यावेळी येथे वैद्यकीय अधिकारी अथवा रूग्णांवर उपचार करणारा एकही कर्मचारी हजर नसुन केवळ एक शिपाई हजर असल्याचे धक्कादायक वास्तव आढळून आले आहे. या आरोग्य पथकांतर्गत अतिदुर्गम करोळ-पाचघर, कडुचीवाडी, कोचाळे आणि कारेगांव यांचा समावेश असून सुमारे ४ हजार ५०० नागरीकांचे आरोग्य अवलंबून आहे. हे आरोग्य पथक खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत आहे.

या आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत गोखले यांना साथरोग काळात मुख्यालयी राहण्याबाबत आणि कार्यक्षेत्रातील गाव, पाड्यातील नागरीकांच्या आजारावर उपचार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच दोन वेळेस नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
– डॉ. पुष्पा मथुरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा

- Advertisement -

यावेळी आमदार भुसारांनी हजर असलेल्या शिपायाकडून औषध साठा आणि गळक्या इमारतीची माहिती घेतली. येथे गंभीर रूग्णांना पुढील ऊपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याची समस्या येथील ग्रामस्थांनी मांडली. काही महिन्यातच येथे आपल्या आमदार निधीतून सुसज्ज रुग्णवाहिका ऊपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर गळक्या इमारतीची दुरूस्तीसाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमदार भुसारांनी ग्रामस्थांना सांगितले.

हेही वाचा –

जीव वाचवण्यासाठी काबूलमध्ये नागरिकांची धावाधाव, तालिबान्यांचा बेछूट गोळीबार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -