घरपालघरसमुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती; विरारच्या सोळा वर्षीय हर्ष चौधरीचा प्रयोग यशस्वी

समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती; विरारच्या सोळा वर्षीय हर्ष चौधरीचा प्रयोग यशस्वी

Subscribe

समुद्राला येणार्‍या भरती ओहोटीचा अभ्यास करून विरारमधील १६ वर्षीय हर्ष कुंजन चौधरी या शाळकरी विद्यार्थ्याने वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे. त्याची चाचणी डहाणूतील बोर्डी समुद्रात यशस्वी झाली आहे.

समुद्राला येणार्‍या भरती ओहोटीचा अभ्यास करून विरारमधील १६ वर्षीय हर्ष कुंजन चौधरी या शाळकरी विद्यार्थ्याने वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे. त्याची चाचणी डहाणूतील बोर्डी समुद्रात यशस्वी झाली आहे. विरार पश्चिमेकडील हर्ष कुंजन चौधरी याने एक अनोखा वीज निर्मिती प्रकल्प साकारला आहे. सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत महाराष्ट्राला मोठा समुद्रिकिनारा लाभला आहे. या समुद्राला येणार्‍या भरती व ओहोटीच्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती यंत्र चालवण्याचा हर्ष याचा मानस आहे. वीज निर्मितीचे लहान यंत्र तयार करून, त्याने अलिकडेच त्याची चाचणी बोर्डी येथील समुद्रात घेतली. ही चाचणी यशस्वी झाली असून यातून वीज निर्मिती झाल्याचा दावा हर्ष याने केला आहे. या यंत्राचा आधार घेऊन सरकारच्या माध्यमातून समुद्रामुळे मोठा प्रकल्प उभा करता येऊ शकतो. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे मच्छीमारीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही हर्ष याने केला आहे.

विरारच्या नॅशनल हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हर्षला लहानपणापासूनच काहीतरी आपण वेगळे करावे, असे वाटत होते. आई वडिलांच्या साथीने आर्थिक पाठबळावर नसतानाही अगदी भंगारातील वस्तूंचा वापर करून त्याने नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला. याची दखल नासानेही घेतली होती. अंडर वॉटर रोबोटिक स्पर्धेसाठी हर्षची नासाकडून निवड करण्यात आली होती. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय नवप्रवर्तन उत्सव व मेगा प्रदर्शन २०२० मध्ये भारतातून निवडलेल्या आणि निवडक ९५० प्रकल्पांपैकी २७ प्रकल्पाच्या यादीमध्ये हर्षच्या प्रकल्पाची निवड झाली होती. कोरोनाच्या काळात सामाजिक दुरीकरण यंत्राची निर्मितीही त्याने केली होती. घड्याळाच्या आकाराचे हे यंत्र आपण हस्तांदोलन करताना आणि चेहर्‍याला स्पर्श करताना आपल्याला व्हायब्रेशन करून इशारा देते. अशा नवनवीन प्रयोगासह त्याने आता समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे.

- Advertisement -

देशात विजेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहेत. कोळशाची कमतरता असल्यामुळे येणार्‍या काळात वीज निर्मितीमध्ये मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकार वीजेवर चालणार्‍या वाहनांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात विजेची मोठी मागणी वाढणार आहे. यासाठी नवीन वीज निर्मिती प्रकल्पांचा शोध घेणे आवश्यक झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्षने हे यंत्र तयार केले आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याचा आपल्या दालनात सत्कार करून कौतुक केले.

हेही वाचा –

Corona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -