घरपालघरखाणार्‍याच्या जीभेला चव,विकणार्‍याच्या पोटाला उब

खाणार्‍याच्या जीभेला चव,विकणार्‍याच्या पोटाला उब

Subscribe

चवीला गोड नसणारी, आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग असून या फळांची मागणी वाढली आहे.

अतिक कोतवाल,जव्हार: हिवाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते उपलब्ध होत असलेल्या विविध रान फळांचे. नुकतीच प्रभावी थंडीला सुरुवात झाली असून खास हिवाळ्यातील रानफळांचे आगमन सुरू झाले आहे. तालुक्याचा विचार केला तर निसर्गात उपलब्ध असलेला रानमेवा येथील आदिवासी नागरिकांसाठी उपजीविकेचे हवामानानुसार एक साधन बनत आहे. हिवाळा सुरू झाल्याने जंगलातील रानफळांना बहर आला असून शहरातील बाजारपेठेत गोड तुरट व आंबट फळांची आवक चांगल्याच प्रकारे वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना जंगलातील उपलब्ध होत असलेले रानफळे बाजारात आणून विक्री करणे व त्यातून आपले दिवस मजुरी सोडवणे असा दिनक्रम हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुरू असतो.
हिवाळ्यात विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. यामध्ये बोंडे, आवळा, बोरे, चिंच इत्यादी फळांचा समावेश होतो. चवीला गोड नसणारी, आंबट, तुरट वर्गात मोडणारी ही फळे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे सर्वांसाठी खास आकर्षणाचा भाग असून या फळांची मागणी वाढली आहे.

खास हिवाळी दिवसातही विविध प्रकारच्या रानफळांना बहर येत असतो. पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार्‍या थंडीच्या मोसमातील पौष्टिक व आरोग्यवर्धक फळे म्हणून ही फळे प्रसिद्ध आहेत. बोरी ,चिंचाप्रमाणे बाजारात आवळा उपलब्ध झाले आहेत.भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारी आवळे १०० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत. आवळ्याचा पेठा, लोणचे, चवनप्राश इत्यादी बनविण्याकडे गृहिणीनी पसंत दिली आहे.

- Advertisement -

आम्ही दररोज सकाळी आंबट बोरे आणण्यासाठी जात असतो. एका 5 किलोच्या फाटीतून एका दिवसात 300 ते 400 रुपये विक्री होऊन दिवसाचा खर्च सुटत असतो. बाजारात खवय्ये देखील आवर्जून जंगलातील आंबट-बोरे शोधत असतात.
– निर्मला ,बोरे विक्री महिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -