घरपालघरपालघरच्या खेड्या-पाड्यात पारंपरिक होलीकोत्सव

पालघरच्या खेड्या-पाड्यात पारंपरिक होलीकोत्सव

Subscribe

शहरीभाग सोडला तर बहुतेक सर्वच गाव,खेडयांमध्ये एक गाव एक होळीची प्रथाही आजही जपण्यात येत आहे.

विक्रमगडः बदलत्या काळात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी अजूनही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर धुळवडीच्या उत्सवात पुर्वजापासुन चालत आलेल्या रुढी,पंरपंरा,प्रथा जपण्याचा व पारंपारिक पध्दतीने सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. यंदाही हजारो होळींचे दहन होणार असून प्रत्येक घरातून होळी मातेची विधीवत पूजा केली जाणार आहे. तर दुसर्‍या दिवशी धुळवडीचे रंग उधळून उत्सव साजरा केला जाणार आहे. शहरीभाग सोडला तर बहुतेक सर्वच गाव,खेडयांमध्ये एक गाव एक होळीची प्रथाही आजही जपण्यात येत आहे.

होळीनिमित्त महिलांनी तांदळाच्या पिठापासून दोन दिवस अगोदरच तयार केलेल्या पापडयांचा होळीला व पुजेचे दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीसाठी लहान मुले तरुण मंडळी प्रत्येक घराघरातून लाकडे,पेंढा,गवत,बांबू गोळा करुन गावाच्या मध्यभागी माळाच्या ठिकाणी (होळीची जागा)ठेवून देतात. महिला रात्री चंद्र उगवल्यानंतर नटुनथटुन तर लहान मुले गळयात सारखरगाठया (साखरेची माळ) घालून ढोल ताशांच्या गजरात आरत्या घेवून गावाच्या मध्यभागी जमतात. नवीन लग्न झालेली जोडपे एकमेकांचे हात पकडून होळी भोवती मोठमोठया आरोळया देत प्रार्थना करीत होळीभोवती प्रदक्षिणा घालताना करतात. होळी व धुळवडीच्या दोन दिवस ग्रामीण भागात खेडया-पाडयांवर रात्रभर ढोलनाच,तारपा नाच, गरबा नृत्य आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. रोजगारासाठी स्थलांतरीत झालेला मजूर गावाकडे परतल्याने होळीच्या सणाला उधाण आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी बाहेर शहराकडे गेला असला तरी होळीच्या दिवसांत घरी परत येऊन आपल्या नातेवाईकांसमवेत सण उत्साहात साजरा करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -