घरपालघरबस थांब्यांना अनधिकृत रिक्षा, पार्किंगचा अडथळा

बस थांब्यांना अनधिकृत रिक्षा, पार्किंगचा अडथळा

Subscribe

त्यापुढे आता परिवहन सेवेचे थांबेही सुशोभित करण्याचा मानस आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला होता. परंतु त्यांच्या या कल्पनेला अनधिकृत रिक्षा थांबे आणि पार्किंगने अडथळा उभा केला आहे.

वसई : महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सुंदर शहरासाठी रस्ते, चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. या कल्पनेला मात्र शहरात असलेल्या बसथांब्यापुढील अनधिकृत रिक्षा थांबे आणि पार्किंगचा अडथळा येत असल्याने महापालिका आणि वाहतूक विभाग हा अडथळा दूर करणार का? प्रश्न नागरिक विचारत आहेत. वसई- विरार महापालिकेने शासनाच्या सुंदर शहर स्पर्धेत भाग घेतला असून त्या निमित्ताने शहरातील रस्ते, चौक यांचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यातीलच पुढचा टप्पा हा बस थांबे सुशोभिकरणाचा आहे. वसई- विरार महापालिकेने रस्त्यातील दुभाजकावर सुंदर चित्रे काढली असून ,रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांभोवतीही कुंपण घालून त्यावर वेगवेगळी चित्रे काढून शहर स्वच्छतेचे संदेश दिले आहेत. त्यापुढे आता परिवहन सेवेचे थांबेही सुशोभित करण्याचा मानस आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला होता. परंतु त्यांच्या या कल्पनेला अनधिकृत रिक्षा थांबे आणि पार्किंगने अडथळा उभा केला आहे.

वसई – विरार महापालिकेच्या परिवहन बससेवेसाठी बनविण्यात आलेल्या बसथांब्यांपैकी काही थांबे बेकायदा रिक्षा आणि पार्किंगमुळे दिसेनासे झालेले आहेत. या बसथांब्यांच्या समोर काही ठिकाणी अनधिकृत रिक्षाथांबे अथवा अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे बस थांब्यांचा प्रवाशांना काहीही उपयोग होत नसून या थांब्यांची जागा बदलावी अथवा या अनधिकृत पार्किंग आणि रिक्षा थांब्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून होत असली तरी वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई होताना दिसत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिवहनच्या बस थांब्यांचे सुशोभिकरण कसे होणार आणि झाले तरी त्याचा फायदा प्रवाशांना होणार का? असे प्रश्न आता समोर येऊ लागले आहेत.

- Advertisement -

बस थांब्यांच्या समोर अनधिकृतपणे रिक्षा थांबे आणि पार्किंग झाली आहे. याबाबत वाहतूक शाखेला ते हटवण्यासाठी पत्र दिले आहे. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे
– अनिलकुमार पवार, आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -