घरपालघरसोनोग्राफी, एक्सरे बंद असल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयावर महिलांचा मोर्चा

सोनोग्राफी, एक्सरे बंद असल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयावर महिलांचा मोर्चा

Subscribe

मनोर ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असून अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर रुग्णांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

मनोर ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव असून अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर रुग्णांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यात सुधारणा करून सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या मागणीसाठी महिलांनी रुग्णालयावर मोर्चा नेला होता. यात सुधारणा झाल्या नाहीत, तर पुढच्या शुक्रवारी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मनोर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया बंद आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन आणि एक्सरे मशीन ऑपरेटर नसल्याने बंद आहे. गरोदर मतांची तपासणी आठवड्यातून एकच दिवस केली जाते. रुग्णालय परिसराची स्वच्छता केली जात नाही. रुग्णांना चांगले आणि वेळेत जेवण उपलब्ध करून दिले जात नाहीत. बाळंतपणा दरम्यान मातांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. रुग्णांना बसण्याची व्यवस्था नाही. रुग्णालयातील ६० टक्के पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याने गरजू रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत येत्या शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महिला सक्षमीकरण संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.

जिल्हा शल्यचिकित्सक संजय बोराडे यांनी मनोर ग्रामीण रुग्णालयात महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांवर चर्चा केली. येत्या काही दिवसांत प्रसूती तज्ज्ञांची नेमणूक करून सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू करण्यात येईल. रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन आणि एक्सरे मशीन सुरू करण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. रुग्णांच्या भोजनाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच कंत्राटदाराला करणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे. यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- Advertisement -

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिडचिड होणे स्वाभाविक असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांसोबतची वर्तणूकीत सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोरांडे यांनी दिल्या. महिला सक्षमीकरण विभागाच्या अध्यक्षा संचिता जनाठे, मनोरच्या माजी सरपंच पौर्णिमा दातेला आणि मनोर परिसरातील महिला उपस्थित होत्या. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या आश्वासनानंतरही महिलांचे समाधान झाले नाही. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी येत्या शुक्रवारी मनोर ग्रामीण रुग्णालयावर आदिवासी एकता मित्रा मंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

हेही वाचा – 

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -