शिंदे-फडणवीस कॅबिनेटमधील 18 मंत्र्यांपैकी 17 जणांवर राष्ट्रवादीकडून आरोप, पाहा व्हायरल फोटो

राज्यपालांचे आगमन होताच राष्ट्रगीताने शपथ विधीला सुरूवात करण्यात झाली.

शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज राज्यपालांच्या दरबारी पार पडला. तब्बल ३९ दिवसांनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात १८ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे गटाकडून दीपक केसरकर, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपच्या पहिल्या पसंतीच्या 9 आमदारांमध्ये चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे यांनी शपथ घेतली.