जळगाव जिल्ह्यात श्री सिद्धी महागणपती भव्य असं देवस्थान उभारण्यात येत असून याठिकाणी जवळपास 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची संकष्टी चतुर्थी निमित्त आज प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. ही मूर्ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती असून ही मूर्ती 374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 2 वर्ष लागली. या मूर्तीचे वजन 100 टन असून मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीची रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती देखील आहेत. मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेवेळी 4-5 हजार भाविकांनी ‘ओम गण गणपतेय नम:’ हा मंत्र लिहिलेली 21 कोटी मंत्र पुस्तके मूर्तीखाली ठेवण्यात आली.