घरमुंबईरमजान संपला; आता मुंब्रा परिसरातील अतिधोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा

रमजान संपला; आता मुंब्रा परिसरातील अतिधोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा

Subscribe

मुंब्रा-कळवा प्रभागातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना पावसाळ्याच्या अगोदर जमिनदोस्त करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. रमजानचा महिना असल्याने या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. मुस्लिम बहुल परिसर असल्याने रहिवाशांना ही सवलत देण्यात आली होती.

पावसाळ्यात अतिधोकादायक इमारतींच्या दुर्घटनेमुळे अनेकवेळा जिवित हानी झाली आहे. तरीही नागरिक जीव मुठीत घेऊन या ठिकाणी रहात असतात. मात्र या वर्षी सदर बाब ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनी गंभीरतेने घेऊन या इमारती तातडीने निष्काशित करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार मुंब्रा-कळवा प्रभागातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना पावसाळ्याच्या अगोदर जमिनदोस्त करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. रमजानचा महिना असल्याने या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. मुस्लिम बहुल परिसर असल्याने रहिवाशांना ही सवलत देण्यात आली होती. मात्र रमजान संपल्यानंतर आता ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले आहे.

१००० इमारतीची दुरुस्ती अत्यावश्यक

मुंब्रा कौसा परिसरात सुमारे सहा इमारती आहेत ज्या ठामपाने अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. फैजान अपार्टमेंट आणि सुलेमान मंझिला या दोन इमारती पाच मजली तर ग्लोरियस स्कूल-कौसा, आशियाना इमारत, साईनाथ इस्टेट, सौमय्या इमारत- शिवाजीनगर या अतिधोकादायक इमारतींवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रमजान महिन्याच्या आधीच सदर इमारती रिकाम्या करण्यास सांगण्यात आले होते. मुंब्रा कौसा परिसरात सुमारे ४४ इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांतील रहिवाशांना देखील इमारती रिकाम्या करून दुरुस्त करण्याकरिता आधीच नोटीसा देण्यात आल्या आहेत. ३०८ इमारतींना रिकाम्या न करता केवळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यापलिकडे सुमारे १००० इमारतीची दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचेही ठामपाने स्पष्ट केले आहे.

या अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करणे आवश्यक होते. मात्र रमजानचा महिना असल्यामुळे या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता तात्काळ या इमारतींवर कारवाई होणार आहे.
– महेश आहेर, उप आयुक्त ठाणे महानगर पालिका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -